JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Breast Cancer : फक्त 1 रुपयात ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार; भारतीय डॉक्टरांनी केली कमाल

Breast Cancer : फक्त 1 रुपयात ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार; भारतीय डॉक्टरांनी केली कमाल

कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे आणि स्तनाचा कॅन्सर हे मोठ्या नैराश्याचे कारण आहे. आता नवीन तंत्रज्ञानामुळे कानपूरमध्ये ही शस्त्रक्रिया जवळपास मोफतच उपलब्ध झाली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अखंड प्रताप सिंह/कानपुर, 19 ऑक्टोबर : हल्ली माणसाला अनेक आजारांची भीती असते. कोणत्याही कारणाने एखादा आजार झाला तर तो बरा करण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी खूप मानसिक शारीरिक आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. कॅन्सर हा शब्द ऐकून तर कोणालाही भीती वाटेल. एकत्र यावर उपचार खूप खर्चिक आहेत आणि सोबतच खूप त्रासदायकदेखील. मात्र जर आम्ही तुम्हाला सांगितलं की, केवळ एका रुपयात ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार होऊ शकतो तर यावर तुमचा विश्वास बसेल का? जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या कॅन्सरच्या महागड्या उपचारांमुळे अनेकांची निराशा झाली आहे. पण आता एक उदाहरण देत कानपूरच्या GSVM मेडिकलने पुढाकार घेऊन केवळ एक रुपयात ब्रेस्ट कॅन्सर उपचाराचे स्वप्न साकार केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील होतकरू डॉक्टरांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढले आहे. प्रथमच ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांवर ऑन्को मॅमोप्लास्टी तंत्राने उपचार करण्यात आले आहेत.

No Bra Day 2022 : काळ्या रंगाची ब्रा घातल्यानं ब्रेस्ट कॅन्सर होतो? पाहा सत्य Video

संबंधित बातम्या

जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ संजय काला यांनी सांगितले की, या तंत्राद्वारे स्तनाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या स्तनातून फक्त संक्रमित भाग काढून टाकला जातो आणि त्याऐवजी व्हॉल्यूम रिप्लेसमेंट पद्धतीने त्याचा आकार बदलला जातो. त्यांनी सांगितले की या तंत्राद्वारे 48 वर्षीय रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जी यशस्वी झाली.

काला यांनी सांगितले की, पहिले स्तन कापल्यामुळे अनेक महिला डिप्रेशनच्या शिकार होत होत्या. काही वेळा अनेक महिलांनी आत्महत्येचे पाऊलही उचलले. त्यामुळे या तंत्राचा खूप फायदा होईल. या ऑपरेशनमध्ये प्लास्टिक सर्जन डॉ प्रेम शंकर, डॉ संजय काला, डॉ शुभम, डॉ पुनीत यांचा सहभाग असल्याचे कला यांनी सांगितले. काला यांनी असेही सांगितले की मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला फक्त ₹ 1 चा फॉर्म भरावा लागेल, तेवढ्यावरच सर्व उपचार केले जातील. No Bra Day 2022 : असा दिवस ज्या दिवशी महिला घालत नाहीत ब्रा; पण का? याशिवाय अनेक शासकीय योजनांचा लाभही थेट रुग्णांना दिला जात आहे. या ऑपरेशनबद्दल बोलायचे झाले तर खासगी हॉस्पिटलमध्ये त्याची किंमत 5 ते 10 लाख रुपये आहे. जर तुमच्याकडे किंवा तुमच्या ओळखीत कोणी असा गरजू रुग्ण असेल तर तुम्ही ही बातमी त्याच्यासोबत जरूर शेअर करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या