JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / म्हणे, 'हा तर ब्रह्माचा अवतार'; विचित्र बाळाला पाहून सर्वांना बसला धक्का

म्हणे, 'हा तर ब्रह्माचा अवतार'; विचित्र बाळाला पाहून सर्वांना बसला धक्का

एका महिलेने अशा बाळाला जन्म दिला, ज्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

जाहिरात

प्रतीकात्मक फोटो

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 06 ऑक्टोबर : सामान्यपणे माणसांना दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे, एक नाक असतं. पण मध्य प्रदेशमध्ये असं बाळ जन्माला आलं, ज्याची चर्चा सर्वत्र होते आहे. दोन नाही तर चार हात-पाय आणि चार कानासह या बाळाचा जन्म झाला. याची माहिती मिळताच या विचित्र बाळाला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. खंडना जिल्ह्यातील शिवरिया गावातील महिला मुंदीतील सरकारी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. तिने एका बाळाला जन्म दिला, बाळ तसं स्वस्थ होतं पण ते  शारीरिकदृष्ट्या विचित्र होतं. रुग्णालय प्रशासाने या बाळाबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. त्यानंतर त्याला पाहण्यासाठी रुग्णालयात लोकांची गर्दी होऊ लागली. रुग्णालयात लोकांची इतकी गर्दी झाली की गर्दीला नियंत्रित करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाला पोलिसांना बोलवावं लागलं. हे वाचा -  ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांची ही असते खासियत; त्यांचे हे 5 गुण छाप पाडतात माहितीनुसार या बाळाला जन्म देणारी त्याची आई 32 वर्षांची गुलका बाई आणि तिचा नवरा राहुल गार्वे दोघंही दिव्यांग आहेत. राहुलला कमी दिसतं आणि गुलकाचे दोन्ही डोळे खराब आहेत. दोघंही मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना एक वर्षाची मुलगीसुद्धा आहे टीव्ही 9 हिंदी च्या वृत्तानुसार शिवरियातील आशासेविका रेणू यांनी सांगितलं की, “महिलेला नियमित आयर्नच्या गोळ्या देण्यात आल्या. तिला सर्व लशीही वेळेत दिल्या होत्या. तिची सोनोग्राफीही केली त्यात तिचं बाळ अविकसित असल्याचं समजलं होतं. तिला गर्भपाताचा सल्ला देण्यात आला होता पण तिने नकार दिला. या महिलेने बाळाबाबत एका बाबाकडून सल्ला घेतला होता” हे वाचा -  बाबा बनताच हा अभिनेता होतोय ट्रोल; काय आहे कारण? या बाळाबाबत बऱ्याच अफवा पसरल्या. त्याच्या आईवडिलांनी त्याला दैवी चमत्कार म्हटलं. काहींनी या बाळाला ब्रह्माचा अवतार म्हटलं आहे. तर काही लोकांनी याला अशुभ म्हटलं आहे. मात्र डॉ. शांता तिर्की म्हणाल्या, “गरोदर महिलांनी वेळेत आपली तपासणी केली नाही, तर अशा घटना समोर येतात. अविकसित बाळ जास्त कालावधी जिवंत राहत नाही” या बाळाचाही जन्मानंतर अर्ध्या तासाने मृत्यू झाला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या