JOIN US
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Women Health : महिलांनी 30 वर्ष ओलांडल्यानंतर 'या' 5 चाचण्या जरुर कराव्यात, वाचा

Women Health : महिलांनी 30 वर्ष ओलांडल्यानंतर 'या' 5 चाचण्या जरुर कराव्यात, वाचा

वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर महिलांना काही आजार होण्याची शक्यता असते. ज्यामुळे महिलांनी वयाच्या 30 वर्षांनंतर काही आरोग्य तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक फोटो, सोर्स : गुगल

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्यात महिला या पुरुषांच्या तुलनेत जास्त संवेदनशील असतात. करिअर, घर, मुलं या सगळ्यात तर महिलांना आपल्या स्वत:ची काळजी घेण्यासाठी देखील वेळ मिळत नाही. त्यात वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतर तर महिलांना काही आजार होण्याची शक्यता असते. ज्यामुळे महिलांनी वयाच्या 30 वर्षांनंतर काही आरोग्य तपासणी करणं अत्यंत महत्त्वाचं असतं असे तज्ज्ञ सांगतात. चला जाणून घेऊया वयाच्या ३० व्या वर्षी महिलांसाठी कोणती आरोग्य तपासणी आवश्यक आहे. 1. थायरॉईड चाचणी बहुतांश महिलांना थायरॉईडचा धोका असतो. ज्यामध्ये शरीरात उपस्थित थायरॉईड हार्मोन्स कमी-अधिक प्रमाणात काम करू लागतात. स्त्रियांच्या वयानुसार थायरॉईडचा धोका जाणून घेण्यासाठी थायरॉईड फंक्शन टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ही आरोग्य तपासणी महिलांना मोठ्या धोक्यापासून वाचवू शकते. वेळेत आजार लक्षात आल्यामुळे त्यावर वेळेत उपचार देखील करता येतात. 2. मॅमोग्राम चाचणी भारतातील 30 वर्षांच्या महिलांनाही स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. हा धोका वेळेत ओळखण्यासाठी मॅमोग्राम चाचणी केली जाते. स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी दर दोन वर्षांनी एकदा मॅमोग्राम चाचणी करावी. ज्यामध्ये स्तनांना दोन एक्स-रे प्लेट्समध्ये ठेवून स्तनाचा कर्करोग शोधला जातो. 3. लिपिड पॅनेल चाचणी लिपिड पॅनेल चाचणी ही पुरुषांसाठी तसेच महिलांसाठी एक महत्त्वाची आरोग्य तपासणी आहे. लिपिड पॅनेल चाचणी शरीरातील कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडच्या पातळीबद्दल सांगते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर तुम्ही वेळेत याची चाचणी केलीत, तर हृदयविकाराचा धोका तुम्ही टाळू शकता. 4. पॅप स्मीअर चाचणी ३० वर्षांनंतरच्या महिलांची पॅप स्मीअर चाचणी करणे आवश्यक आहे. ही चाचणी ओटीपोटात उपस्थित असलेल्या ग्रीवाच्या पेशींची तपासणी करून गर्भाशय पिशवीच्या कर्करोगाच्या जोखमीबद्दल सांगते. याशिवाय, पॅप स्मीअर चाचणी स्त्रीच्या योनी, अंडाशय, फॅलोपियन ट्यूब, गर्भाशय, व्हल्व्हा आणि लैंगिक संक्रमित रोगांचे आरोग्य देखील सांगते. 5. रक्तदाब चाचणी हार्मोनल बदल, गर्भधारणा किंवा तणाव यासारख्या परिस्थितींमुळे स्त्रियांमध्ये कमी किंवा उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो. म्हणूनच महिलांनी रक्तदाब तपासणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात हृदयविकार टाळता येतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या