गोवा, 07 मार्च : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (goa vidhan sabha election 2022) मतदान प्रक्रिया पार पडली आहे. आता दोन दिवसांत विधानसभेची मतमोजणी होणार आहे. पण, आज आलेल्या एक्झिट पोलमध्ये (exit poll) भाजपचे मिशन 22 + सपशेल फेल ठरत असल्याचे चित्र आहे. पण, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी भाजपला 18 ते 22 जागा मिळतील, असा दावा केला आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी तयार केलेले एक्झिट पोल समोर आले आहे. गोव्यात बहुमतासाठी 21 जागांचा आकडा गाठावा लागणार आहे. पण भाजपला 16 जागांपर्यंत अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र एक्झिट पोलचा अंदाज साफ खोटा ठरवला आहे.
आम्ही ग्राऊंड लेव्हलवर काम केले आहे. हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे गोव्यात भाजपचेच सरकार येणार आहे. आम्हाला 18 ते 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे डब्बल इंजिन सरकार जनतेनं स्विकारलं आहे, इतर चारही राज्यात भाजपचे सरकार येईल असा दावा सावंत यांनी केला. तर, गोव्यात भाजपची एकहाती सत्ता येईल आणि 22 प्लसचा नारा भाजप पूर्ण करेल असा विश्वास गोव्याचे उपमुख्यमंत्री मनोहर अजगांवकर यांनी व्यक्त केला. तसंच, ‘आप आणि तृणमूलचा आम्हाला फायदाच होणार असून त्यांचा सुफडा साफ होईल आणि ‘उत्पल पर्रीकरच्या बंडखोरीचा काहीच परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय. (एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंक वर क्लिक करून मिळेल) गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. झी न्यूज हिंदीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाला 1 ते 3 जागांवर समाधान मानावे लागेल. गोव्याची मगोवा पार्टीला 2 ते 5 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेनेनं सुद्धा नशिब आजमावले आहे. पण सेनेला कोणतीही जागा मिळणार नाही, अशी चिन्ह आहे. झी न्यूज वृत्तवाहिनीचा एक्झिट पोल अंदाज भाजप- 13-18 जागा काँग्रेस+ 14-19 जागगा महाराष्ट्र गोमांतक पार्टी - 2-5 जागा आम आदमी पार्टी - 1-3 जागा इतर 1-3 जागा तर veto च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 14 जागा मिळतील असता अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला सर्वाधिक 16 जागा मिळतील. तर आपला 4 आणि इतर पक्षाला 6 जागा मिळणार असा अंदाज वर्तवला आहे.