गोवा, 07 मार्च : पाच राज्यांच्या निवडणुकीची (Assembly Election Result 2022 ) प्रचाराची रणधुमाळी आता थांबली आहे. त्यामुळे सर्वांची प्रतिक्षा मतमोजणीकडे लागली आहे. गोवा विधानसभा (goa vidhan sabha election 2022) निवडणुकीत यावेळी अभुतपूर्व अशी परिस्थितीत पाहण्यास मिळाली होती. त्यामुळे गोव्यात काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशातच एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहे. यामध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 40 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. झी न्यूज हिंदीने केलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपला 13 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 14 ते 19 जागा मिळतील अशी शक्यता आहे. तर आम आदमी पक्षाला 1 ते 3 जागांवर समाधान मानावे लागेल. गोव्याची मगोवा पार्टीला 2 ते 5 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिवसेनेनं सुद्धा नशिब आजमावले आहे. पण सेनेला कोणतीही जागा मिळणार नाही, अशी चिन्ह आहे.
झी न्यूज वृत्तवाहिनीचा एक्झिट पोल अंदाज
Goa Politics : काँग्रेस सोडलेले गोव्याचे 7 आमदार अमित शहांच्या भेटीला, मोठ गिफ्ट मिळणार?
मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार
आता गोव्यात 'काय हाटील, काय डोंगर'चं सत्र सुरू! काँग्रेस आमदारांना चेन्नईला हलवलं
घरात न सांगता व्हॅलेटाईन साजरा करण्यासाठी प्रेमी युगुल गोव्याला गेलं अन् परत आलेच नाहीत
मुलीनं केली कमाल! मायक्रोसॉफ्टनं दिलं बंपर पॅकेज; 8-10 लाख नव्हे सॅलरीचा आकडा बघून व्हाल थक्क
गोव्यातील कर्ली क्लब पाडण्यास सुरुवात; याच क्लबमधील पार्टीनंतर झालेला सोनाली फोगटचा मृत्यू
Goa Tourism : गोवा फिरण्यासाठी जातायेत? 'या' ठिकाणी होईल मोफत राहण्याची सोय
पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का
गोव्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना, रिसॉर्टमध्ये डच महिलेसोबत भयंकर घडलं
संतापजनक! मुंबईत कोरियन मुलीच्या छेडछाडीनंतर गोव्यात विदेशी महिलेसोबत थेट..
Airplane Emergency Landing : गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग, धक्कादायक VIDEO
भाजप- 13-18 जागा
काँग्रेस+ 14-19 जागगा
महाराष्ट्र गोमांतक पार्टी - 2-5 जागा
आम आदमी पार्टी - 1-3 जागा
इतर 1-3 जागा
उत्तर प्रदेशमध्ये भाजपला बहुमत
दरम्यान, पहिल्या EXIT POLL चा निकाल बाहेर येत आहे. रिपब्लिक टीव्हीने दाखवलेल्या मतदानोत्तर चाचणीत - UP Exit Polls 2022 मध्ये उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. पण तरीही गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीसारखं निर्विवाद घवघवीत यश मात्र योगी सरकार टिकवू शकणार नाही असं चित्र आहे.
(एक्झिट पोल्सविषयी अधिक माहिती शेअरचॅटच्या या लिंकवर क्लिक करून मिळेल)
रिपब्लिकच्या एक्झिट पोलनुसार भाजपला 262 ते 272 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर समजावादी पक्षाला 119 ते 134 जागा मिळतील. समाजवादीच्या जागा वाढलेल्या असल्या तरी काँग्रेस आणि बसपाचा सपशेल पराभव होण्याची शक्यता या एक्झिट पोलमध्ये वर्तवली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातलं मतदान (UP Assembly election 2022)सोमवारी पार पडलं. मतदानोत्तर कल चाचणीत (Exit Polls 2022)कुठल्या पक्षाचं पारडं जड असेल आणि कोण कुणाला धूर चारेल याचा अंदाज येऊ शकतो.
उत्तर प्रदेशात 403 जागांच्या विधानसभेसाठी मतदारांनी कौल दिला आहे. याचा निकाल गुरुवारी 10 मार्चला लागेल. एकूण 7 टप्प्यात मतदान झालं. त्यापैकी अखेरच्या टप्प्यातलं मतदान 7 मार्चला मतदान यंत्रात बंदिस्त झालं आणि Exit Polls चा कल यायला सुरुवात झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.