सोल, 27 एप्रिल : उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नावांमध्ये एक समान शब्द असला तरी त्यांचे 1945 पासून विळ्या भोपळ्याचं नातं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियावरील जपानचे वर्चस्व संपुष्टात आले. त्यानंतर अमेरिका आणि रशियाने त्यांना आपल्या प्रभावाखाली घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पुढे याच कारणामुळे कोरियाची फाळणी झाली. एक भाग दक्षिण कोरिया आणि दुसरा उत्तर कोरिया बनला. एकावर अजूनही अमेरिकेचा प्रभाव आहे, तो लोकशाही आहे तर दुसरीकडे रशिया आणि चीनचा प्रभाव आहे. तिथे किम कुटुंब तीन पिढ्यांपासून हुकूमशाही परंपरेत राज्य करत आहे. दोन कोरियन देशांमधील शत्रुत्व इतकं टोकाला गेलंय की त्यांची सीमारेषा ही जगाची धोकादायक सीमा बनू लागली आहे. या सीमेला डीएमझेड (DMZ) म्हणजेच डिमिलिटराइज्ड झोन म्हणतात. उत्तर आणि दक्षिण कोरियाची ही सीमा अत्यंत धोकादायक मानली जाते. दोन देशांना विभाजित करणारी ही सीमा या दोन देशांना जोडण्याचे साधनही आहे. परंतु, ही सीमा जगातील कोणत्याही दोन देशांमधील सीमांपैकी सर्वात धोकादायक मानली जाते. अखेर त्यामागे काय कारण आहे? कोरिया डिमिलिटराइज्ड झोन सर्वात ‘धोकादायक सीमा’ का आहे? या सीमेवर जवळपास 25 ते 30 हजार उत्तर कोरियाचे रक्षक नेहमीच उभे असतात. असे म्हटले जाते की संपूर्ण जगात सर्वाधिक सुरक्षारक्षकांनी वेढलेली ही सीमा आहे. ही सुमारे 4 किलोमीटर रुंद आणि 250 किलोमीटर लांब आहे, जी 1953 पासून या दोन देशांना विभाजित करत आहे. जगावर अणुयुद्धाची टांगती तलवार! युक्रेनला अमेरिका आणि नाटोकडून शस्त्रे मिळाल्याने रशिया संतापला दोन्ही बाजूला असंख्य भूसुरुंग या सीमेच्या दोन्ही बाजूंना असंख्य भूसुरुंग आहेत, कोणत्याही व्यक्तीने पाऊल ठेवताच त्यांचा स्फोट होऊ शकतो असे सूत्रांनी सांगितले. संपूर्ण सीमा काटेरी तारांनी वेढलेली आहे. या भूसुरुंग आणि काटेरी झुडपे एकाच ठिकाणी रिकामी ठेवण्यात आली आहेत. येथूनच दोन्ही देशांना एकमेकांशी देवाणघेवाण करण्याचा मार्ग मिळतो. किम जोंग उनही याच मार्गाने दक्षिण कोरियाला गेले होते.
उत्तर कोरियाचे सैनिक असे का? उत्तर कोरियाच्या सैनिकांना नेहमी गडद रंगाचे गॉगल घालण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कारण, त्यांचा चेहरा पाहून कोणीही त्यांचे हावभाव कोणी वाचू नये. यासोबतच दक्षिण कोरियाच्या सैनिकांना आणि तेथून जाणाऱ्यांना उत्तर कोरियाच्या सैनिकांना पाहून कोणतेही विचित्र स्वरूप किंवा हावभाव करू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे केल्याने काय परिणाम होईल असे विचारले असता, ‘काहीही होऊ शकते’ असे सांगणारे सांगतात. एक पूल ज्यावरून कोणीही परत आले नाही दोन्ही देशांच्या सीमेवर जाणाऱ्या मार्गावर असा पूल आहे, जिथून कोणीही परत येत नाही. खरे तर 1953 मध्ये दोन्ही देशांमधील शीतयुद्ध संपले असताना या पुलावरून दोन्ही देशातील युद्धकैद्यांना एका देशातून दुसऱ्या देशात पाठवले जात होते. याला ‘पुन्हा परत न येण्याचा पूल’, म्हणजेच कधीही न परतणाऱ्यांचा पूल असे नाव पडले. त्याचा मार्ग आजही खूप भितीदायक आहे.