Water Taxi Mumbai: आजपासून मुंबईत धावणार देशातील पहिली वॉटर टॅक्सी, जाणून घ्या वेळ, तिकीट दर आणि कसे असेल बुकिंग मुंबई, 17 फेब्रुवारी : आपल्या देशात दळणवळण्याच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. यात दिवसेंदिवस नवीन गोष्टींची भर पडत असते. अशातूनच देशातील पहिली वॉटर टॅक्सीसेवा मुंबईतील बेलापूर ते भाऊचा धक्का यादरम्यान गुरुवारपासून सुरू करण्यात आली. मात्र, या वॉटर टॅक्सीचे प्रवास भाडे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच असणार आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का हे अंतर अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण करणाऱ्या स्पीड बोट सेवेसाठी 825 ते 1210 रुपये इतके एकेरी भाडे आकारण्यात येणार आहे तर, हेच अंतर 50 मिनिटांत पार करणाऱ्या ‘कॅटामरान’साठी 290 रुपये इतके भाडे मोजावे लागणार आहे. त्यामुळे ही सेवा नेमकी कोणासाठी आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यानिमित्ताने ही वॉटर टॅक्सीसेवेबद्दल जाणू घेऊया. जलद जलवाहतुकीसाठी योजना जलवाहतुकीचा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी वॉटर टॅक्सी प्रकल्प हाती घेण्यात आला. मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सिडको अशा तीन यंत्रणांनी वॉटर टॅक्सी प्रकल्प प्रत्यक्षात आणला आहे. बेलापूर आणि नेरुळ येथे नवी जेट्टी यासाठी बांधण्यात आली आहे. तर चार खासगी कंत्राटदारांची नियुक्ती करत यांच्या माध्यमातून वॉटर टॅक्सीची प्रत्यक्ष सेवा देण्यासाठी आता महाराष्ट्र सागरी मंडळ सज्ज झाले आहे. त्यानुसार गुरुवारी या वॉटर टॅक्सीचे लोकार्पण होणार आहे. मात्र, या प्रवासाचे भाडेदर अधिक असल्याकारणाने त्याला कितपत प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. भाऊचा धक्का ते बेलापूर एकेरी प्रवासासाठी 290 रुपये असे दर असून हे दर परवडणारे असल्याचे यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. मात्र, त्याच वेळी कमी दरात प्रवास करायचा असेल तर प्रवासासाठी 20 मिनिटे अधिक खर्च करावे लागणार आहेत. कारण 290 रुपयांत भाऊचा धक्का ते बेलापूर प्रवास कॅटामरान बोटीने करावा लागणार आहे. ही बोट हे अंतर पार करण्यासाठी 50 मिनिटांचा अवधी घेणार आहे. हेच अंतर केवळ 30 मिनिटांत पार करायचे असेल तर मग मात्र प्रवाशांना रु. 825 ते 1210 (ऐकेरी) मोजावे लागणार आहेत. म्हणजेच 20 मिनिटांचा वेळ वाचविण्यासाठी थेट 535 ते 920 रुपये अधिक खर्च करावे लागणार आहेत. सात जलद बोटी बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 जलद बोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबर एलिफंटा व जेएनपीटी या मार्गावरसुद्धा जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. चार खासगी कंपन्यांद्वारे ही सेवा देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी सांगितले. बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 जलद बोटी आणि 56 प्रवासी क्षमता असलेली कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे ही सेवा दिली जाणार आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबर एलिफंटा व जेएनपीटी या मार्गावरसुद्धा जलवाहतूक सेवा सुरू होणार आहे. चार खासगी कंपन्यांद्वारे ही सेवा देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी सांगितले. Triple Decker Buses | जगातील पहिली ट्रिपल डेकर बस कशी होती? ही सेवा का बंद पडली? वेळ काय असेल? वॉटर टॅक्सी चालवणाऱ्या इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस एलएलपीचे प्रमुख सोहेल काजानी म्हणाले की, वॉटर टॅक्सी वर्षातून 330 दिवस सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत चालवण्याचे नियोजन आहे. ऑपरेटर्सच्या म्हणण्यानुसार, फेरीला डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (DCT) पासून नवी मुंबईला जाण्यासाठी सुमारे 30 मिनिटे लागतील आणि DCT ते JNPT पर्यंत 15 ते 20 मिनिटे लागतील. कसे बुक करायचे? बुकिंग तपशीलांसाठी प्रवासी सेवेचा लाभ घेण्यासाठी इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. जे खाजगी ऑपरेटर्सपैकी एक आहे. वेबसाइटला भेट देण्यासाठी https://infinityharbour.in/ या लिंकवर क्लिक करा. तुम्ही या स्टेप्स फोलो करून वॉटर टॅक्सी सेवा बुक करू शकता दिलेल्या पर्यायांमधून वॉटर टॅक्सी मार्ग शोधा आणि निवडा वॉटर टॅक्सी निवडल्यानंतर प्रवासी त्यांच्या आवडीची सीट निवडू शकतात वॉटर टॅक्सी पेमेंट तुम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून करू शकता.