मुंबई, 29 डिसेंबर : हवामान बदलामुळे (Climate Change) हवामानाच्या पद्धती, प्रमाण आणि परिणामांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. आता हवामान (Whether) आणि हवामानातही नवनवीन प्रकार पाहायला मिळत आहेत. यात नवीन प्रकारच्या हवामान स्थितीचा देखील समावेश आहे, जी केवळ जगाच्या एका भागात पाहायला मिळाली आहे. या संकुचित, संथ-गतीने, आर्द्रता-समृद्ध वादळांना संशोधक वायुमंडलीय तलाव (Atmospheric Lake) म्हणत आहेत. असे पलाव पश्चिम हिंदी महासागरात दिसत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळले आहे. काय आहे हा प्रकार? याचे जगावर काय परिणाम होतील? या संदर्भात आता अभ्यास केला जात आहे. आफ्रिकेच्या दिशेने प्रवाह ही वादळे पश्चिम हिंदी महासागरातून आफ्रिकेकडे जात आहेत. वादळे सहसा वातावरणातील भवऱ्यामुळे तयार होतात. पण हे तलाव एकाच ठिकाणी पाण्याची वाफ साचल्यामुळे तयार होत असल्याचे समोर आले आहे. हे वादळ इतकं गडड असते की यामुळे पाऊसही पडतो. हे वायुमंडलीय तलाव वायुमंडलीय नद्यांसारखे आहेत. या नद्या दाट आद्रतेच्या विरळ पट्ट्या आहेत. छोटे आणि मंदी गती हा अभ्यास अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या 2021 च्या शरद ऋतूतील बैठकीत सादर करण्यात आला. यानुसार, लहान, मंद गतीने चालणारे वातावरणीय तलाव स्वतःला ज्या ऋतू प्रणालीपासून तयार करतात त्यापासून वेगळे करतात. ही वाफ कधी कधी पश्चिमेकडून आफ्रिकन किनाऱ्यावर येते. परिणामी अर्ध-शुष्क भागात पाऊस पडतो. कमी वारा असलेल्या भागात वायुमंडलीय नद्या पावसाच्या स्त्रोतापासून पावसाच्या किनारी भागापर्यंत जोडलेल्या असतात. येथेच पाण्याच्या बाष्पाचे तुटलेले भाग वेगळे होतात, म्हणून त्यांना वायुमंडलीय तलाव म्हटलं जाते. विषुववृत्तीय भागात जेथे वाऱ्याचा वेग खूपच कमी असतो, तेथे हे तलाव तयार होतात, त्यामुळे हे तलाव कुठेही जाण्याची घाई करताना दिसत नाहीत. हिमालयापेक्षा उंच पर्वत रांग तयार होणार! भारताचाही आकार बदलणार सर्वात मोठं वादळ 27 दिवसांचं गेल्या पाच वर्षांच्या हंगामी आकडेवारीवरून असे दिसून येते की असे सर्वात मोठे वादळ एकूण 27 दिवस चालले आहे. गेल्या पाच वर्षांत विषुववृत्तापासून 10 अंश अक्षांशांमध्ये सहा दिवसांपेक्षा जास्त काळ टिकणारे 17 वायुमंडलीय तलाव आढळले आहेत. हे पूल इतर भागात देखील तयार होण्याची शक्यता आहे जिथे ते कधीकधी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांमध्ये बदलले असतील. हे वादळ कसे तयार होते? या घटनेचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. ज्यापासून या वादळाची निर्मिती झाली आहे, त्यापासून ते स्वतःला कसे आणि का वगळे करतात? हे शोधण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. असे वातावरणातील वाऱ्याचे स्वरूप हे अंतर्गत वाहत असलेल्या वाऱ्यांमुळे निर्माण झाले आहे असा अंदाज वर्तविला जात आहे.
या वादळांमुळे पडतो भरपूर पाऊस संशोधकांचे म्हणणे आहे की यात हवामान बदलाचा पैलू महत्त्वाचा आहे. कारण जर वाढत्या तापमानाचा या तलावांवर परिणाम होत असेल तर त्याचा परिणाम आफ्रिकेच्या पूर्व किनार्यावरील पर्जन्यवृष्टीवर होऊ शकतो. जर या तलाव वादळांमुळे एकाच वेळी पाऊस पडला तर कमी क्षेत्रात भरपूर पाऊस होईल. यामुळे वेगळं संकट उभं राहू शकतं. कोरोना सावटातही विज्ञानात यंदा अनेक शोध! दातांशिवाय हत्तींचा जन्म तर.. शास्त्रज्ञांना त्यांच्या अभ्यासासाठी स्थानिक पातळीवर अधिक तपशीलवार माहिती हवी आहे. मात्र, हे असे भागात आहेत जिथे महिन्यातून फक्त एकदाच माहिती घेतली जाते. कदाचित त्यामुळेच आतापर्यंत या तलाव वादळांची फारशी माहिती मिळालेली नाही.