JOIN US
मराठी बातम्या / Explainer / 'या' दिवशी पृथ्वीच्या जवळून जाणार महाकाय उल्का! पृथ्वीला धोका आहे का? शास्त्रज्ञ म्हणतात..

'या' दिवशी पृथ्वीच्या जवळून जाणार महाकाय उल्का! पृथ्वीला धोका आहे का? शास्त्रज्ञ म्हणतात..

पुढील आठवड्यात, एक अतिशय महाकाय उल्का (Huge Asteroid Closest to Earth) पृथ्वीच्या अगदी जवळून जाण्याची शक्यता आहे. तो इतका मोठा आहे की त्याला प्लॅनेट किलर (Planet Killer) म्हणजेच कोणत्याही ग्रहाचा नाश करणारा म्हटले जात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

न्यूयॉर्क, 18 मार्च : जगाचा अंत होणार आहे, अशा बातम्या तुम्ही अनेकदा वाचल्या किंवा पाहिल्या असतील. या तारखेला जगबुडी होईल आणि पृथ्वीचा अंत होईल. अनेक वेळा लघुग्रह आदळल्यामुळे (Asteroid Hit) पृथ्वीचा नाश होणार असल्याच्याही बातम्या येतात. आता असाच आणखी एक इशारा नासाच्या शास्त्रज्ञांनी पुढील आठवड्यासाठी जारी केला आहे. त्यांनी सांगितले की पुढील आठवड्यात महाकाय उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. त्याला मॉन्स्टर प्लॅनेट किलर असे नाव देण्यात आले आहे. तो पृथ्वीच्या कोणत्याही भागावर आदळला तर संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल. या महाकाय उल्कापिंडाला 2013 BO76 असे नाव देण्यात आले आहे. हा प्लॅनेट किलर 24 मार्च रोजी पृथ्वीच्या कक्षेजवळून जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत असे म्हटले जात आहे की तो पृथ्वीच्या बाजूने कोणतेही नुकसान न होता कक्षेतून जाईल. पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याची टक्कर होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. यामुळे शास्त्रज्ञ त्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. अंतराळावर नेमकं कोणाचं वर्चस्व? रशिया-युक्रेन युद्धामुळे अख्ख्या जगावर संकट? 9 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दर्शन NASA ने 2013 BO76 बद्दल लोकांना इशारा दिला आहे. नासाने सांगितले की 24 मार्च रोजी उल्कापिंड पृथ्वीच्या जवळून जाईल. त्याचा आकार 600 ते पंशराशे फूट सांगितला जात आहे. याला प्रथम 17 जानेवारी 2013 रोजी पाहिले गेले. त्यानंतर 7 मार्च रोजी त्याचे छायाचित्र काढण्यात आले. त्यावेळी तो पृथ्वीपासून सुमारे 15 दशलक्ष मैल दूर होता. किती अंतर बाकी? 24 मार्च रोजी ते पृथ्वीच्या सर्वात जवळ पोहोचेल. त्यावेळी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर केवळ तीन लाख मैल असेल. मात्र, आकड्यांचा विचार करता ते अजून दूर असले तरी वर-खाली काहीही झाले तर विनाशही येऊ शकतो. यामुळे नासाचे शास्त्रज्ञ सतत त्यावर लक्ष ठेवून आहेत. NASA ने त्यांच्या संभाव्य धोक्यांच्या यादीत 2013 BO76 चा समावेश केला आहे. तुम्हाला ही उल्का पाहायची असेल, तर तुम्ही ती ऑनलाइन व्हर्च्युअल टेलिस्कोप प्रकल्पांतर्गत पाहू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या