JOIN US
मराठी बातम्या / Explainer / श्रीलंकेच्या स्थितीवरून समजून घ्या, देश दिवाळखोर कसे होतात? आणखी काही देश या मार्गावर

श्रीलंकेच्या स्थितीवरून समजून घ्या, देश दिवाळखोर कसे होतात? आणखी काही देश या मार्गावर

येत्या काही दिवसांत श्रीलंकेतील परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे परकीय कर्जाची परतफेड तात्पुरती थांबवण्याची घोषणा केली आहे, त्यानंतर देशात तेल, जीवनावश्यक वस्तू, औषधांचा दुष्काळ पडण्यासोबत किमती आणखी वाढतील. त्याचवेळी लंकेचा रुपया आणखी वाईट स्थितीत येईल. मात्र, ही परिस्थिती आलेला हा पहिलाच देश नाही.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

कोलंबो, 13 एप्रिल : आपला शेजारी देश श्रीलंका 70 वर्षांतील सर्वात वाईट आर्थिक परिस्थितीतून (sri lanka Economy crisis) जात आहे. देशाचा परकीय चलनाचा साठा जवळपास संपला आहे. बाहेरून तेल आणि जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी देशात पैसा नाही. श्रीलंकेच्या रिझर्व्ह बँकेने सर्व विदेशी कर्जाची परतफेड तात्पुरती थांबवण्याची घोषणा केली आहे. श्रीलंका आता आर्थिकदृष्ट्या दिवाळखोरीच्या (bankrupt) उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अखेर कोणताही देश दिवाळखोर कसा होतो? आणि या परिस्थितीचा त्याच्यावर काय परिणाम होतो? आता अशा स्थितीत लंकेवर काय परिणाम होईल, हे पाहणार आहोतच. पण, त्याच वेळी, असे कोणते देश आहेत, ज्या अशा स्थितीतूनही सावरले. अर्जेंटिनामध्ये 2000 ते 2020 या दोन दशकांमध्ये ही स्थिती दोनदा आली आहे. आता तिथे परिस्थिती नियंत्रणात आहे. 2012 मध्ये ग्रीसची स्थितीही अत्यंत वाईट होती. तो दिवाळखोर झाला होता. पण, त्याची गाडी आता रुळावर आली आहे. 1998 मध्ये युक्रेनवर हल्ला करून महासत्ता झाल्याचा भास करणारा रशिया स्वतःच दिवाळखोर झाला होता. खाद्यपदार्थांसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सरकारचं अस्तित्व राहिलं नव्हतं. यानंतर सोव्हिएत युनियनचे अनेक देश फुटले. ही परिस्थिती 2003 मध्ये उरुग्वेमध्ये घडली होती. 2005 मध्ये डोमिनिकन रिपब्लिक आणि 2001 मध्ये इक्वेडोर दिवाळखोर झाले. या भोवऱ्यात पाकिस्तान कधीही अडकू शकतो पाकिस्तानची ही स्थिती काही वर्षांपेक्षा कमी-जास्त वर्षांपासून असल्याचे दिसते. नेपाळबाबतही असेच बोलले जात आहे की तेथेही आर्थिक दुरवस्था होऊ शकते. यामध्ये श्रीलंका पूर्णपणे अडकला आहे. कोणत्याही देशाने डिफॉल्टर असणे सामान्य आहे, असे बड्या अर्थतज्ज्ञांचे मत आहे. असे मानले जाते की ही परिस्थिती जगातील सर्व देशांमध्ये कधी ना कधी आली आहे. आर्थिक संकटात श्रीलंकेने आजवर जे अशक्य होतं ते साध्य केलं! वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान 90 च्या दशकापूर्वी, आर्थिक दिवाळखोरीमुळे फारसा परिणाम झाला नाही, कारण तेव्हा बहुतेक देश आयातीवर कमी अवलंबून होते. जीवनशैली तशी नव्हती. कार आणि लक्झरी इतके आवश्यक वाटत नव्हते. जीवन खूप साधे होते. त्यामुळे अशा धक्क्यातून ते लवकरच बाहेर पडायचे. श्रीलंकेप्रमाणेच इतर देशांनीही हे काम केलं श्रीलंका सध्या जे काम करत आहे, तशाच प्रकारचे काम इतर देश दिवाळखोरीच्या वेळी करतात. लंकेने जे काम केले त्याचा परिणाम जगभरातील सर्व बाँड व्यवहारांवर, आंतरराष्ट्रीय बँकांसोबतचे व्यवहार, सरकारांमधील व्यवहार आणि आयात-निर्यात याबरोबरच परकीय चलन गुंतवणुकीवर होणार आहे. श्रीलंकेच्या या घोषणेचा अर्थ असाही होतो की, आता त्यांनी हात वर केले आहेत की आता त्यांच्याकडे काहीच नाही. ते आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे शरण जातील. त्यांच्या अटी काहीही असो, त्यावर कर्ज घेण्याचा प्रयत्न करतील. पण आयएमएफकडून कर्ज घेतल्यानंतरही या संपूर्ण प्रक्रियेला अनेक महिने लागू शकतात. श्रीलंकेत येणारा काळ अधिक त्रासदायक असणार याचा अर्थ असाही होतो की लंकेसमोर अनेक महिने बाहेरून आयात होणारे तेल आणि जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ इत्यादींचे संकट उभे राहणार आहे. त्यात दूध आणि आवश्यक औषधेही असतील. त्यामुळे देशात अराजकता निर्माण होईल. राजकीयदृष्ट्या, येत्या काही महिन्यांत श्रीलंकेत अधिक अस्थिरता असेल. श्रीलंकेची स्थिती 6 महिन्यांत सुधारू शकते, फक्त ‘या’ एकाच गोष्टीची गरज! तांत्रिकदृष्ट्या श्रीलंका दिवाळखोरीत निघणार नसला तरी तो त्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे हे नक्की. पाकिस्तान या परिस्थितीतून जात आहे. कर्ज काढून जुने कर्ज फेडले जात असून बाहेरून माल आणला जात आहे. अर्जेंटिनानेही कर्ज फेडण्यास नकार दिला अर्जेंटिनाने 2001 मध्ये आपल्या कर्जदारांची परतफेड करण्यास नकार दिला होता. तेव्हा अर्जेंटिनावर प्रचंड कर्ज होते. प्रचंड बेरोजगारीमुळे लोक रस्त्यावर हिंसक आंदोलन करत होते. बँकांसमोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ब्रेडसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होता, त्या अत्यंत महाग झाल्या होत्या. त्याचे कारण चुकीचे चलन मूल्यांकन धोरण होते. त्यानंतर अर्जेंटिनाने आपले चलन पेसो हे डॉलरच्या बरोबरीचे केले होते. एक पेसो म्हणजे एक डॉलर. पण अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दरासमोर अर्जेंटिना कोणत्याही प्रकारे बरोबरी करू शकला नाही. त्यामुळे त्यांची परकीय गुंतवणूक कोलमडली, त्यानंतर आयात-निर्यातीवर मोठा परिणाम होऊ लागला. अर्जेंटिना अशा भोवऱ्यात अडकू लागला की त्याला सावरणे कठीण झाले. त्यांना परदेशातून क्रेडिट मिळणे बंद झाले. अर्जेंटिनियन चलन पेसो तोंडावर आपलटलं. परिणामी देश कोसळला. देशभरात हिंसाचार पसरला. लोक रस्त्यावर उतरले. बंका बंद करण्यात आल्या. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. दिवाळखोरी म्हणजे काय? दिवाळखोरी म्हणजे तुमचे क्रेडिट रेटिंग सतत खालावते. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांचा त्यांच्यावरील विश्वास उडतो. क्रेडिट रेटिंग खराब असेल तर कर्ज द्यायला कोणी तयार होत नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अपेक्षित कर्ज मिळणेही सोपे नसते. डिफॉल्टर असण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही देय तारखेला कर्ज भरले नाही. ही दिवाळखोरीची सुरुवात असते. श्रीलंकेसाठी दिलासा देणारी बाब काय आहे? श्रीलंकेची देशांतर्गत अर्थव्यवस्था दिवाळखोर झालेली नाही. कर महसूल अजूनही येत आहे. सध्या त्याचा ओघ कमी झाला आहे. चलनातही व्यवहार सुरू आहेत. त्यांची देशांतर्गत अर्थव्यवस्था अजूनही रिकव्हरी मोडमध्ये आहे. पण बेरोजगारी, नोकऱ्यांची वानवा, पर्यटनातून मिळणारे उत्पन्न कमी होणे या सगळ्यात विचार करायला लावणाऱ्या परिस्थिती आहेत. ज्याचा त्यांना लगेच सामना करावा लागत आहे. जर परिस्थिती नीट हाताळली तर देश पुन्हा उभा राहू शकतो. पण तसे दिसत नाही. याला अनेक कारणे आहेत. परकीय चलनाचा ओघ थांबल्याने श्रीलंकेचा परकीय व्यापार ठप्प झाला आहे. याच्याशी निगडीत लोक मोठ्या प्रमाणावर बेरोजगार झाले आहे, त्याचा वेगळा परिणाम होत आहे. ठरलेल्या किंमतीपेक्षा जास्त भावाने डॉलर काळ्या बाजारात विकला जात असून लोक खरेदी करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या