मुंबई, 17 डिसेंबर : मंगळाच्या (Mars) पृष्ठभागावरील परिस्थिती पाण्याच्या अस्तित्वासाठी अनुकूल नाही, ध्रुवावर बर्फ आहे. मात्र, संपूर्ण ग्रहावरच तापमान खूपच कमी असते. यानंतरही शास्त्रज्ञ या ग्रहावर द्रवरूप पाण्याचा शोध घेत आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाखाली मुबलक पाणी असावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. युरोपियन स्पेस युनियन (ESA) च्या ट्रेस गॅस ऑर्बिटरने मंगळाभोवती प्रदक्षिणा घालत मंगळाच्या खोऱ्यांच्या प्रणालीमध्ये पाणी शोधले आहे. हे पाणी वलस मरीनरीजमध्ये पृष्ठभागाच्या खाली दिसले आहे. किती मोठं क्षेत्र? या छुप्या रिझर्व्हचा आकार सुमारे 45 हजार चौरस किलोमीटर आहे, जो भारतातील हरियाणा राज्याच्या बरोबरीचा आहे. या नवीन शोधामुळे खगोलशास्त्रज्ञांना एक नवीन क्षेत्र मिळाले आहे जेथे ते ध्रुवाच्या पलीकडे पाणी शोधू शकतात. यान मंगळाच्या मातीच्या वरच्या एक मीटर पृष्ठभागावर हायड्रोजनची उपस्थिती शोधत होते, जे पाण्याची उपस्थिती सूचित करते. मंगळाच्या विषुववृत्ताजवळ पाण्याचा शक्यता मंगळाच्या विषुववृत्तावर तापमान इतक ठिकाणाच्या तुलनेत जास्त असल्याने या ठिकाणी बर्फ तयार होत नाही. ऑर्बिटरने जमिनीतील धुळीच्या कणांनी झाकलेल्या बर्फाच्या रूपात पृष्ठभागावर पाणी शोधले. यामध्ये मंगळाच्या खालच्या अक्षांशांमध्ये असलेल्या खनिजांमध्ये जमा झालेल्या पाण्याचा शोध समाविष्ट होता. शास्त्रज्ञांना या शोधात काही प्रमाणात यश आले आहे. पृष्ठभागाच्या खाली एक मीटर मॉस्को येथील रशियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूटचे इगोर मिट्रोफेनोव्ह स्पष्ट करतात, की “टीजीओच्या माध्यमातून आपण मंगळाच्या धुळीच्या थराच्या खाली एक मीटरपर्यंत पाहू शकतो. आणि मंगळाच्या पृष्ठभागाखाली खरोखर काय चालले आहे ते देखील आपण पाहू शकतो. हे आपल्याला पाण्याने भरलेल्या ‘मरुद्यान’ची स्थिती निश्चित करण्यास मदत करते जे पूर्वीच्या उपकरणांद्वारे दिसू शकत नव्हते.
Mass Extinction | उल्कापिंड महाविनाशकारी कसे बनतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर
पाण्याच्या हायड्रोजनने दिले संकेत या शोधामागचे कारण म्हणजे ऑर्बिटरमध्ये स्थापित केलेली फाइन रिझोल्यूशन एपिथर्मल न्यूट्रॉन डिटेक्टर (FREND) दुर्बीण. याने वॉलेस मॉरिनारिसच्या विशाल बेसिन सिस्टीममधील एक क्षेत्र उघड केले आहे, ज्यामध्ये असामान्यपणे मोठ्या प्रमाणात हायड्रोजन आहे जे आपण पाण्याच्या रेणूंमध्ये बांधलेले पहातो. या भागाच्या पृष्ठभागाजवळील 40 टक्के पदार्थांमध्ये पाणी असल्याचे दिसून येते. यापूर्वीही या भागात पाणी असण्याची आशा युरोपियन स्पेस एजन्सीने बुधवारी सांगितले की पाण्याने समृद्ध प्रदेश नेदरलँडच्या आकारमानाचा आहे. त्यात कँडर कोसच्या खोल खोऱ्यांचा समावेश आहे. हा भाग मंगळावरील पाण्याच्या शोधासाठी योग्य मानल्या जाणाऱ्या खोऱ्यांच्या प्रणालीचा भाग असल्याचे मानले जाते. मंगळावरील पाण्याचा, विशेषतः द्रव पाण्याचा शोध ही सर्वात मोठी समस्या मानली जाते.