अहमदाबाद, 8 फेब्रुवारी : अहमदाबादमध्ये 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी (Ahmedabad serial blasts case) येथील विशेष न्यायालयाने मंगळवारी 49 जणांना दोषी ठरवले आहे. या स्फोटांमध्ये एकूण 56 जणांचा मृत्यू झाला होता. न्यायाधीश एआर पटेल यांनी 28 आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या प्रकरणातील एकूण 77 आरोपींविरुद्ध खटला पूर्ण केला होता. 2008 मध्ये देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबादही यातून सुटले नाही. येथे तासाभरात 20 ठिकाणी 21 बॉम्बस्फोट झाले. हे दहशतवादी इंडियन मुजाहिदीन गटाचे होते. ज्याने नंतर जयपूर, सुरत, वाराणसीसह इतर अनेक मोठ्या शहरांना लक्ष्य केले. काय घडलं त्या एका तासात? ज्याने संपूर्ण देशाच्या कानठाळ्या बसल्या होत्या. 51 लाख पानांचे आरोपपत्र अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी आज सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अंबालाल पटेल यांनी 77 आरोपींच्या शिक्षेवर निर्णय दिला. बॉम्बस्फोट खटल्यातील हा पहिलाच निकाल असेल, जो न्यायालयात ऑनलाइन सुनावण्यात आला आहे. न्यायाधीश अंबालाल पटेल सत्र न्यायालयात बसून आभासी निकाल दिला. या संपूर्ण प्रकरणावर एकूण 51 लाख पानांचे आरोपपत्र असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामध्ये 1163 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य ठेवण्यात आल्या आहेत. 2009 पासून या खटल्याची नियमित सुनावणी सुरू आहे. 21 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 56 जणांचा मृत्यू 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 20 ठिकाणी 70 मिनिटांत एकामागून एक 21 स्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हे हल्ले पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या संगनमताने झाले. बॉम्बस्फोटानंतर मुख्य 3 आरोपी यासीन भटकळ, रियाझ भटकळ आणि इक्बाल पाकिस्तानात पळून गेले. मात्र, नंतर यासीनला पकडण्यात आले. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, 77 पैकी 49 आरोपी दोषी आरोपी देशातील विविध कारागृहात बंद या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या विविध कारवाईत दोन डझनहून अधिक आरोपींना अटक करण्यात आली. हे आरोपी मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, जयपूर आणि केरळसह 7 राज्यांतील तुरुंगात कैद केले गेले. असे 28 आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात, एकट्या अहमदाबादमध्ये 20 एफआयआर नोंदवण्यात आले, तर सुरतमध्ये 15 एफआयआर नोंदवण्यात आले. आज न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला आहे. 49 जण दोषी 13 वर्षे जुन्या या खटल्यावर न्यायालयाने मंगळवारी निकाल दिला. न्यायालयाने 49 जणांना दोषी ठरवले आहे. या खटल्याची सुनावणी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संपली होती. विशेष न्यायाधीश एआर पटेल यांनी या हायप्रोफाईल खटल्याचा निकाल दिला. या निर्णयाबाबत यापूर्वी अनेकदा सूचना करण्यात आल्या होत्या, मात्र नंतर तो पुढे ढकलण्यात आला होता.