Home /News /national /

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात कोर्टाचा मोठा निर्णय, 77 पैकी 49 आरोपी दोषी

अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी गुजरात कोर्टाचा मोठा निर्णय, 77 पैकी 49 आरोपी दोषी

2008 साली अहमदाबाद शहरात अवघ्या एक तासात तब्बल 21 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad serial bomb blast) करण्यात आला होता.

    अहमदाबाद, 08 फेब्रुवारी: 2008 साली अहमदाबाद शहरात अवघ्या एक तासात तब्बल 21 ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad serial bomb blast) करण्यात आला होता. या प्रकरणी गुजरात न्यायालयाने (Gujrat Court) 77 पैकी 49 जणांना दोषी (49 Accused found guilty) ठरवलं आहे. तर 28 जणांची निर्दोष सुटका केली आहे. उद्या गुजरात न्यायालयाकडून 49 दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. हा निकाल 2 फेब्रुवारी रोजीच लावला जाणार होता. पण ऐनवेळी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एआर पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाली. त्यामुळे हा निकाल लांबणीवर पडला. ही साखळी बॉम्बस्फोटाची घटना 26 जुलै 2008 रोजी घडली होती. यादिवशी अहमदाबाद नगर पालिका क्षेत्रातील तब्बल 21 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. हे सर्व बॉम्बस्फोट केवळ एका तासात घडले होते. या स्फोटानं संपूर्ण देश हादरला होता. या हल्ल्यात 56 निष्पाप नागरिकांचा जीव गेला होता. तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये 20 तर सुरतमध्ये 15 गुन्हे दाखल केले होते. संबंधित गुन्ह्यातील सर्व आरोपी एकाच कटाचा भाग असल्याने सर्व गुन्हे मर्ज करून एकत्रित खटला भरवण्यात आला होता. हेही वाचा-मोदींच्या भाषणामुळे वाईट वाटलं, कोरोना महामारीत माणुसकी विसरलो का?:सुप्रिया सुळे या साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अहमदाबादला भेट दिली होती. या भेटीनंतर 28 जुलै रोजी गुजरात पोलिसांची एक विशेष टीम तयार करण्यात आली होती. या पोलीस पथकानं अवघ्या 19 दिवसांत 30 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर उर्वरित दहशतवाद्यांना वेळोवेळी अटक करण्यात आली. अहमदाबादमधील साखळी बॉम्बस्फोटांपूर्वी इंडियन मुजाहिदीनच्या याच दहशतवाद्यांनी जयपूर आणि वाराणसीमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवून आणला होता. त्यामुळे देशभरातील अनेक राज्यांचे पोलीस त्यांच्या शोधात होते. हेही वाचा-CM योगींना जीवे मारण्याची खुलेआम धमकी; लेडी डॉनचं ट्विट व्हायरल, पोलीस सतर्क अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 जुलैला सूरतमध्ये देखील बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला होता. पण टायमरमध्ये बिघाड झाल्यामुळे हे स्फोट होऊ शकले नाहीत. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 77 जणांना अटक केली होती. यातील 49 जणांना गुजरात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. तर 28 जणांची निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणी आरोपींना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bomb Blast, Court, Crime news, Gujrat

    पुढील बातम्या