मुंबई, 23 डिसेंबर- विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट वटपौर्णिमा हे व्रत करतात. वटपौर्णिमेच्या व्रतामागे सत्यवान आणि सावित्री यांच्या प्रेमाची, निष्ठेची कथा आहे. ही कथा वर्षानुवर्षे आपण ऐकत आलो आहोत. आता हीच कथा मालिकेच्या स्वरूपात प्रेक्षक लवकरच पाहू शकतील. झी मराठी ( zee marathi) लवकरच ही मालिका घेऊन येत आहे. यासोबतच आता झी मराठीवरील कोणती मालिका ब्रेक घेणार व त्याची जागा ही मालिका घेणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. झी मराठीवर सत्यवान सावित्री (Satyavan Savitri) ही पौराणिक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच आऊट झाला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना मालिकेबद्दलची उत्सुकता लागली आहे. या मालिकेत कोण कलाकार असणार आहेत ही माहिती अजूनही समोर आलेली नाही.सत्यवान सावित्री ही झी मराठीवर सादर होणार असल्यामुळे प्रेक्षकांनी मालिकेबद्दल आतुरता व्यक्त केली आहे. ही मालिका लवकरच वाहिनीवर प्रदर्शित होणार असून त्यात सत्यवान आणि सावित्रीची प्रमुख भूमिका कोण निभावणार हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल.
या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोमध्ये एक मोठा वटवृक्ष दिसून येत आहे. सोबतच सत्यवान-सावित्रीची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रोमो पाहिल्यानंतर आता कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असा प्रश्नही प्रेक्षकांमध्ये उपस्थित केला जात आहे. वाचा- ‘छोटे उस्ताद’ चा तो Video पाहून अभिनेत्री म्हणतेय मराठी शाळा बंद करा! झी मराठीवर किचन कल्लाकार, हे तर काहीच नाही, देवमाणूस 2 या मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेता. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी आणखी एका मालिकेची भर पडणार आहे. त्यामुळे ही मालिका सुरू होण्याची प्रेक्षक वाट पाहत आहेत.