JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'Zee Marathi' च्या सोशल मीडिया पोस्ट्सची झाली उलटापालट, अकाउंट हॅक की आणखी काय...?

'Zee Marathi' च्या सोशल मीडिया पोस्ट्सची झाली उलटापालट, अकाउंट हॅक की आणखी काय...?

झी मराठीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालं आहे, होय चित्र तर तसचं काहीसं दिसत आहे. कारण झी मराठीचं इन्स्टाग्राम, फेसबुक अकाउंट पाहिल्यानंतर सर्व पोस्टसची उलटापालट झाल्याचे दिसत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 फेब्रुवारी- सध्या सोशल मीडिया अकाउंट हॅकचं प्रमाण वाढलं आहे. अनेक कलाकार असतील किंवा राजकीय मंडळी यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचं आपण वाचलं आहे. हे प्रमाण आता वाढत चाललं आहे. झी मराठीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालं आहे, होय चित्र तर तसचं काहीसं दिसत आहे. कारण झी मराठीचं इन्स्टाग्राम, फेसबुक अकाउंट पाहिल्यानंतर सर्व पोस्टसची उलटापालट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. सगळीकडं झी मराठीचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं प्रकरण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. झी मराठीचं फेसबुक, इंस्टाग्राम पेज हॅक झालं असून पेजवरच्या सर्व पोस्ट्स उलट्या पालट्या दिसत आहेत. फोटो, व्हिडिओ आणि कॅप्शन सगळंच उलटं झाल्याचं दिसत आहे. आता झी मराठीचं सोशल मीडिया अकाउंट खरंच हॅक झालंय की, हि काही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे याचा उलगडा लवकरच होईल.

झी मराठीच्या तू चाल पुढं, सातव्या मुलीची सातवी मुलगी, यशोदा अशा मालिका सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. काही नेटकऱ्यांनी तर व्हिडिओ उलटं झाल्याचं सांगत असं का झालं आहे याबद्दल विचारलं आहे. त्यामुळे झीच्या प्रेक्षकांना मात्र चिंता लागली आहे.

मालिका म्हटलं की, झी मराठी असचं चित्र पाहायला मिळतं. पण मागच्या काही काळात स्टार प्रवाह या वाहिनीच्या मालिका टीआरपीमध्ये नंबर वनवर पाहायला मिळतात. त्या तुलनेत झी मराठी कुठं तरी मागे पडल्याचे चित्र दिसते. त्यामुळे झी मराठीचा हा कोणता नवीन प्रमोशनला फंडा आहे का असा देखील प्रश्न पडतो. यावरून देखील लवकरच पडदा पडेल हे नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या