मुंबई, 1 मार्च- झी मराठवरील लोकप्रिय कार्यक्रम ज्याने फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण देशाला ज्यांनी हसायला शिकवलं तो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ या कार्यक्रमाने सगळ्यांना भरभरून हसायला शिकवलं. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेता सागर कारंडे होय. सागर कारंडे म्हटल्यावर हसू येणारच. अगदी डाऊन टू अर्थ म्हणतात तसा हा नट चला हवा येऊ द्यामधून तुम्हा आम्हाला कधीकधी अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवतो तर कधी पोस्टमन काका बनून अंतर्मुख करत टचकन् डोळ्यात पाणी आणतो. आज सागर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहचला आहे. वाचा- इरफानच्या माघारी त्याच्याच गर्लफ्रेंडला डेट करत होता नवाजुद्दीन,मग घडलं असं काही म्हणजे अगदी मुंबई, पुण्यासारखा शहरी भागा असो किंवा ग्रामीण भाग असो सागर जिथे दिसतो तिथे तो आपल्याला हसवतो असं जणू समिकरणच झालं आहे. मात्र, सध्या त्याच्या या पत्रवाचनाची जागा एका अन्य व्यक्तीने घेतल्याचं दिसून येत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात सागर कारंडे कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांना पत्रवाचन करुन दाखवतो. ही पत्रे अनेकदा भावनिक, समाजप्रबोधन करणारी असतात. परंतु, सागर ती ज्या पद्धतीने सादर करतो ते वाखाणण्याजोगं असतं त्यामुळे ‘चला हवा येऊ द्या’मध्ये पत्रवाचन आणि सागर कारंडे हे जणू समीकरण झालं आहे. झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात सागरऐवजी एक अन्य व्यक्ती पत्रवाचन करताना दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर ‘चला हवा येऊ द्याचा’एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री श्रेया बुगडे पत्रवाचन करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमात सागरऐवजी श्रेया बुगडे पत्रवाचन करणार की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र श्रेया बुगडेच्या पत्रवाचनाला देखील प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. नुकतचं चला हवा येऊ द्याच्या मंचावर विष्णू मनोहर, मधुरा बाचल, अर्चना आर्ते यांसारख्या सेलिब्रिटी शेफने हजेरी लावली होती. त्यामुळे या खास भागात श्रेयाने पत्रवाचन केलं.