मुंबई, 26 फेब्रुवारी- झी मराठीवरील देवमाणूस 2 ही मालिका सततच्या ट्वीस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. मात्र पहिल्या सीझनप्रमाणे देवमाणूसच्या दुसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून म्हणावा तसा प्रितसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत नुकतीच एका नवख्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. विशेष म्हणजे ही अभिनेत्री ( vaishnavi kalyankar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिला सोशल मीडिया स्टार म्हणून ओळखलं जातं. आज आपण तिच्याविषयीचं ( vaishnavi kalyankar biography) जाणून घेणार आहे. देवमाणूस 2 या मालिकेत सोनूची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव वैष्णवी कल्याणकर आहे. वैष्णवीची हि पहिलीच मालिका आहे. वैष्णवी ही मूळची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहरातली आहे. डी. जी. रुपारेल कॉलेजमधून तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे. वैष्णवीला नृत्या सोबतच अभिनयाची आवड आहे.
युट्युब वर वैष्णवीचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कडक शो च्या माध्यमातून ती विविध व्हिडिओतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. धर्मा मुव्हीज क्रिएशनच्या शाळा प्रत्येकाच्या आठवणीतील या वेबसीरिजमध्ये वैष्णवीने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. व्हॅलेंटाईन डे आणि धोका, एक परदेसी मेरा अशा व्हिडिओमध्ये देखील ती दिसली आहे. वाचा- ‘लय अंग दुखायले का..’, वहिनीसाहेबांच्या ट्रेडिंग रील्सवर चाहत्याची भन्नाट कमेंट देवमाणूस 2 मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये सोनूची एंट्री झाली आहे. ही सोनू खूप श्रीमंत असून आपल्या जागेच्या व्यवहारात अडचणी आल्याने ती डॉक्टरची मदत मागायला वाड्यात येते. मात्र डॉक्टरची तिची भेट होत नसते अशातच बज्या सोनूला उचलून डॉक्टरकडे घेऊन येतो आणि तिच्यावर उपचार करायला सांगतो. या उपचारावर सोनू डॉक्टरचे आभार मानत त्यांना डॉक्टर अंकल म्हणते. यानंतर पुढे काय होणार याचा उलगडा येणाऱ्या भागात होणार आहे.