JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 19 हजारांमधून झाली होती निवड, आता Zaira Wasim ला झालंय तरी काय?

19 हजारांमधून झाली होती निवड, आता Zaira Wasim ला झालंय तरी काय?

Zaira Wasim च्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयामुळे अनेकांनाच धक्का बसला. नक्की कसं होतं तिचं आयुष्य…

0110

आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण त्यापूर्वी झायरानं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात
0210

फार कमी वयात ‘दंगल’ आणि ‘सिक्रेट सुपरस्टार’ यांसारखे हिट सिनेमे देणाऱ्या झायरानं अचानकपणे बॉलिवूड सोडत असल्याचा खुलासा तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केला.

जाहिरात
0310

झायरानं नुकतंच सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर करत ती या निर्णयापर्यंत का आली याचं स्पष्टीकरणही दिलं आहे. झायरा वसीमनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक 6 पानी नोट लिहित तिच्या बॉलिवूड सोडण्याच्या निर्णयाचं स्पष्टीकरण दिलं.

जाहिरात
0410

‘5 वर्षांपूर्वी माझा नवा प्रवास सुरू झाला, बॉलिवूडमध्ये मी प्रवेश केला. आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. या क्षेत्रानं मला खूप प्रेम, पाठिंबा आणि कौतुक मिळालं. पण त्यासोबतच मी शांतपणे किंवा अजाणतेपणे 'इमान'च्या मार्गावरून बाजूला गेले. माझ्या इमानात ढवळाढवळ करणाऱ्या वातावरणात मी सातत्यानं काम करत राहिले. माझ्या धर्माशी असलेल्या माझ्या नात्यालाच आव्हान निर्माण झालं. माझ्या धर्माची जी मूलभुत तत्व आहेत, त्याचं मला ज्ञान नव्हतं याची जाणीव झाली.’

जाहिरात
0510

‘आत्म्याच्या आवाजापासून दूर जाऊन घुसमट होते, या घुसमटीत जगणं असह्य आहे. महान आणि दैवी कुराणाच्या सान्निध्यात मला समाधान आणि शांती मिळते. मनाला खरोखर तेव्हा शांती मिळते जेव्हा त्याला निर्मात्याची ज्ञानप्राप्ती होते.’ या सगळ्यात आज आम्ही तुम्हाला तिच्या आयुष्याशी निगडीत 10 फारशा माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

जाहिरात
0610

झायराचा जन्म २३ ऑक्टोबर २००० मध्ये जम्मू- काश्मीर येथील श्रीनगर येथे झाला. २०१२ मध्ये जम्मू काश्मीर बोर्डाच्या सेंट पॉल आंतरराष्ट्रीय अकादमीमधून तिने १० वीची परीक्षा दिली.

जाहिरात
0710

झायरा वसीमचे वडील झहीद वसीम हे जम्मू- काश्मीर बँकेत कार्यकारी व्यवस्थापक आहेत तर आई झायरा वसीम या शाळेत शिक्षिका आहेत.

जाहिरात
0810

जेव्हा झायराला दंगल सिनेमासाठी विचारण्यात आले तेव्हा तिच्या आई- बाबांनी बॉलिवूडमध्ये काम करण्याच्या तिच्या निर्णयाला विरोध केला. पण झायराच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि काकूने आई- वडिलांना समजावलं.

जाहिरात
0910

दंगल सिनेमासाठी झायराची निवड १९ हजार मुलींमधून निवड करण्यात आली होती. दंगल सिनेमात काम करण्यापूर्वी तिने टाटा स्काय आणि नोकिया लुमिया या प्रोडक्टच्या जाहिरातीही केल्या होत्या.

जाहिरात
1010

झायराला गिटार वाजवायला फार आवडतं. तसेच ती थोडी लाजाळू असल्याने तिला सिनेसृष्टीत फार मित्र- मैत्रिणी नाहीत. असं असलं तरी तिला मांजरी प्रचंड आवडतात.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या