JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Yuzvendra chahal and Dhanashree Verma : घटस्फोटाच्या चर्चानंतर चहलची पत्नी निघाली माहेरी; व्हिडीओ तुफान व्हायरल

Yuzvendra chahal and Dhanashree Verma : घटस्फोटाच्या चर्चानंतर चहलची पत्नी निघाली माहेरी; व्हिडीओ तुफान व्हायरल

घटस्फोटाच्या चर्चानंतर धनश्री-युझी या कपलचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

जाहिरात

Yuzvendra chahal and Dhanashree Verma funny reel

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या  खासगी आयुष्याविषयी सध्या प्रचंड उलट-सुलट चर्चा सुरु आहेत.  युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी प्रसिद्ध युट्यूबर आणि डान्सर धनश्री वर्मा  हे जोडपे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत आहे.  कारण धनश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरील युजरनेम मधून चहल आडनाव हटवलं. तेव्हापासून या  दोघांच्यात बिनसल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. ही चर्चा थेट घटस्फोटापर्यंत पोहोचली. पण या दोघात सर्वकाही आलबेल असल्याची माहिती नुकतीच समोर  त्यातच आता  आता धनश्रीने दोघांच्या दुराव्याच्या चर्चेतनंतर सोशल मीडियावर  नवा व्हिडिओ इस्टावर पोस्ट केला आहे. युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय दिसून येते. ती नेहमी तिचे डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. धनश्रीचे तिच्या इन्स्टाग्रामवर तिचा नवरा युझवेंद्र चहल याच्यासोबतचे अनेक रोमँटिक फोटो आहेत.  त्यामुळेच जेव्हा तिने सोशल मीडियावर चहल आडनाव हटवले त्याची प्रचंड चर्चा झाली.

संबंधित बातम्या

पण आता धनश्री-युझी  या कपलचा एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. या जोडप्याने एक मजेशीर रिल शेअर केले आहे. इन्स्टाग्रामवर हे रिल क्षणार्धात व्हायरल झाले असून त्यांना पुन्हा एकदा अशाप्रकारे व्हिडिओ बनवताना पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांच्यात काही बिनसलेलं नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे. हेही वाचा - Sonalee Kulkarni : ‘हिरकणी’ नंतर सोनाली कुलकर्णी पुन्हा साकारणार ऐतिहासिक भूमिका; चित्रपटाचा मुहूर्त संपन्न धनश्री-युझीने एका ट्रेंडिंग ऑडिओवर रिल केले आहे. ज्यात धनश्री म्हणते की, ‘मी एका महिन्यासाठी माहेरी जाते. त्यावर  युझवेंद्रची प्रतिक्रिया बघण्यासारखी आहे. तो हातातील रिमोट फेकतो आणि आपल्याच धुंदीत नाचायला लागतो आणि तो गाणे म्हणतो, ‘तेरी इसी अदा पे सनम, मुझको तो प्यार आया’ आणि तिचे गाल ओढतो. या रिलमध्ये चहल त्याच्या स्टाइलमध्ये धमाल डान्सही करताना दिसत आहे. त्यांचा हा नवा व्हिडिओ आणि त्यांची मस्ती सर्वकाही सांगून जात आहे की, या दोघांमध्ये काहीही बिनसलेलं नाही. धनश्री आणि चहलने डिसेंबर २०२० मध्ये लग्नगाठ बांधली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या