मुंबई, 21 जून : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर क्रिकेटर युवराज सिंग सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. पण सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर युवराज रिअॅलिटी शोमध्ये भाग घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एवढंच नाही तर दोन रिअॅलिटी शोसाठी युवराजला विचारणा झाली असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ‘बिग बॉस सीझन 3’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या दोन शोची ऑफर असल्याची चर्चा आहे. बिग बॉसचे निर्माते आणि रोहित शेट्टीचा फिअर फॅक्टर शो ‘खतरों के खिलाडी’ यांनी आपापल्या शोसाठी युवराजला विचारणा केल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. मात्र यासंबंधी युवी कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. या 5 कारणांसाठी पाहायला हवा शाहिद कपूरचा ‘Kabir Singh’
युवराजच्या नावाची चर्चा असेलेले हे दोन्ही शो कलर्स टीव्हीवर टेलिकास्ट होतात. याआधीही अनेकदा या दोन्ही शोसाठी युवराजला विचारण्यात आलं होतं. मात्र क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे युवराजनं या शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिला होता. पण आता युवी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानं तो या शोमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. स्पॉटबॉच्या रिपोर्टनुसार आतापर्यंत गेम शो ‘खतरों के खिलाडी’साठी टीव्ही अभिनेता करण पटेलचं नाव फायनल करण्यात आलं आहे. त्याशिवाय अभिनेत्री क्रिस्टल डिसोझाचं नावही या शोसाठी चर्चेत आहे. Kabir Singh Review : सिनेमा पाहायला जाण्याआधी जाणून घ्या कसा आहे ‘कबीर सिंग’
भारताला 2011 सालच्या वर्ल्डकपमध्ये मिळालेल्या विजयात मोलाची कामगिरी बजावणारा भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनं 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृती जाहीर केली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, ‘माझ्या चाहत्यानी नेहमीच मला समर्थन दिलं त्यांचे आभार मानण्यासाठी खरं तर माझ्याकडे शब्द नाहीत. 2011चा वर्ल्डकप जिंकणं माझ्यासाठी मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार मिळण्यासारखं होतं. त्यानंतर मला कॅन्सरनं ग्रासलं. हे सर्व आकाशातून जमिनीवर येण्यासारखं होतं. मात्र त्यावेळी माझ्या चाहत्यांनी मला खंबीर साथ दिली. ते नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले.’ यावेळी युवी भावूक झाला होता. नुकतचं त्यानं बीसीसीआयला पत्र लिहून इतर देशांच्या टी-ट्वेटी लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे रिअॅलिटी शोमध्ये युवी सहभागी होणार का याबाबत शंका कायम आहे. सध्या युवी सुट्टी एंजॉय करत आहे. World Refugee Day निर्वासित मुलांसाठी प्रियांका चोप्राचं भावनिक आवाहन
================================================================ VIDEO : नववधूला घेऊन पती गेला दर्शनला, पण ती प्रियकरासोबत पळाली