JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / यामी गौतमपासून राणी मुखर्जीपर्यंत यंदा सगळ्या स्त्रियाच गाजवणार का Box Office?

यामी गौतमपासून राणी मुखर्जीपर्यंत यंदा सगळ्या स्त्रियाच गाजवणार का Box Office?

आजवर महिलांवर केंद्रित तयार झालेल्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. याआधी हिरोशिवाय चित्रपट ही कल्पनाच करणं अशक्य होतं. अशा चित्रपटांमध्ये महिलांची भूमिका फार महत्त्वाच्या स्थानी नसायची. तसंच, प्रेमकथांवर आधारित चित्रपटांनी एक काळ गाजवला. मात्र आता महिलांवर आधारित चित्रपटांना प्रेक्षक डोक्यावर घेत आहेत. तसंच, वैचारिक चित्रपटांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा प्रेक्षक यामी गौतम, तापसी पन्नू, राणी मुखर्जी, नुसरत भरूचा आणि संजना सांघी यांच्या आगामी चित्रपटांची आतुरतेनं वाट पाहत आहेत. चला पाहूया, कोणते आहेत ते चित्रपट..

0106

आजकाल महिलांवरील चित्रपटांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. तेव्हा झी स्टुडिओ यावर्षी महिलांवर आधारित अनेक चित्रपट आणणार आहे. आतापर्यंत महिलांवर केंद्रित असलेले जे चित्रपट बनले आहेत, त्या सर्वांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. आता प्रेक्षक यामी गौतम, तापसी पन्नू, राणी मुखर्जी, नुसरत भरूचा आणि संजना संघी यांच्या या वर्षीच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर चला पाहूया कोणते आहेत ते चित्रपट-

जाहिरात
0206

यामी गौतमचा 'लॉस्ट' - एक इन्वेस्टिगेटिव्ह ड्रामा लॉस्ट हा चित्रपट अनिरुद्ध रॉय चौधरी यांनी दिग्दर्शित केला आहे आणि नमः पिक्चर्सच्या सहकार्याने झी स्टुडिओजद्वारे हा समर्थित आहे. ही एक इमोशनल थ्रिलर फिल्म आहे, जो या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात
0306

राणी मुखर्जीचा श्रीमती चॅटर्जी बनाम नॉर्वे - आशिमा छिब्बर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एका भारतीय जोडप्याची सत्यकथा सांगतो.

जाहिरात
0406

तापसी पन्नूचा ब्लर - अजय बहल यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात एका महिलेची कथा आहे, जी तिच्या जुळ्या बहिणीच्या मृत्यूच्या तपासावर काम करत आहे. हे काम करत असताना तिने तिची दृष्टी गमावल्याची ही कथा आहे.

जाहिरात
0506

नुसरत भरुचाचा जनहित में जारी - जय बसंतू सिंग यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. नुसरतसोबत, यात अनु ढाका, विजय राज आणि अपेक्षा त्रिपाठी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका तरुण मुलीची कथा आहे, जी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करते.

जाहिरात
0606

संजना सांघीचा ओम: द बॅटल - कपिल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 1 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. पॉवर पॅक्ड अॅक्शन ड्रामा, हा चित्रपट आशाजनक आहे आणि संजना सांघी पूर्णपणे वेगळ्या रूपात दाखवतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या