JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'आम्हां मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागत नाही तर... प्राजक्ताची आई पप्पांसाठी स्पेशल पोस्ट

'आम्हां मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागत नाही तर... प्राजक्ताची आई पप्पांसाठी स्पेशल पोस्ट

कधी लेक कधी बहिण कधी आत्या कधी नणंद अशा वेगवेगळ्या भूमिका खऱ्या आयुष्यात सांभाळत असेलली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali) ‘वाय’ ( Y the Film) या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. स्त्री भ्रूण हत्येच्या खऱ्या घटनेवर आधारीत हा सिनेमा प्रदर्शित झाला असून त्यानिमित्त प्राजक्तानं तिच्या कुटुंबियांचं आभार मानत खास पोस्ट लिहिली आहे.

0110

रानबाजार फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या मराठीतील टॉप वन अभिनेत्री ठरली आहे. रानबाजारनंतर प्राजक्ताचा 'वाय' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

जाहिरात
0210

बीडमधील स्री भ्रूण हत्येच्या सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा असून प्राजक्ता या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

जाहिरात
0310

सिनेमा प्रेक्षकांना आवडेल यात काही शंका नाही. दरम्यान प्राजक्तानं तिच्या कुटुंबाबरोबरचा फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत.

जाहिरात
0410

आपण पाहिलं तर प्राजक्ताला एक भाऊ आहेत. तसंच तिच्या भावाला देखील दोन गोंडस मुली आहेत. त्यामुळे गायकवाड घरात स्त्रीयांची संख्या जास्त आहे.

जाहिरात
0510

याविषयी प्राजक्तानं तिच्या आई वडिलांचे आभार मानत फार मोलाची पोस्ट शेअर केली आहे.

जाहिरात
0610

'आई पप्पा तुमचे किती आणि कसे आभार मानू ? आम्हां मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागत नाही तर सोहळा केलात', असं प्राजक्तानं म्हटलं आहे.

जाहिरात
0710

वाय हा सिनेमा स्त्री भ्रूण हत्येसारख्या गंभीर विषयावर भाष्य करणारा सिनेमा आहे. प्राजक्तानं तिच्या कुटुंबाचं उदाहरण देत स्त्रियांचं महत्त्वं पटवून देण्याचा प्रयत्न केलाय.

जाहिरात
0810

प्राजक्ताच्या पोस्टमधून तिचं आणि तिच्या कुटुंबियांमध्ये असलेलं घट्ट नात्याची जाणीव होत आहे.

जाहिरात
0910

शेवटी तिनं 'चित्रपट पोचला पाहिजे, जीव वाचला पाहिजे', असं म्हणतं सिनेमा पाहण्याचं आवाहन केलं आहे.

जाहिरात
1010

प्राजक्ता नेहमीच तिच्या भाच्यांबरोबरचे तिचे फोटो शेअर करत असते. आत्या भाच्यांची धम्माल मस्ती पाहायला प्राजक्ताच्या चाहत्यांना नेहमीच आवडतं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या