'व्हाय दिस कोलावेरी डी' गाण्याचा अर्थ
मुंबई, 20 मे- मनोरंजनसृष्टीत चित्रपटांप्रमाणेच त्यातील गाणीसुद्धा सुपरहिट होत असतात. किंवा गाण्यांमुळे चित्रपट हिट व्हायला मदत होते असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अशी अनेक गाणी आहेत ज्यांनी प्रेक्षकांना चित्रपटाबाबत उत्सुकता वाढवली आहे. सोबतच अशी काही गाणी आहेत ज्यांनी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वानांच वेड लावलं आहे. त्यातीलच एक दाक्षिणात्य गाणं म्हणजे ‘व्हाय दिस कोलावेरी डी’ हे होय. या गाण्याने फक्त साऊथ इंडियन लोकांनाच नव्हे तर संपूर्ण जगाला वेड लावलं होतं. सध्या साऊथ चित्रपटांची चलती आहे असं म्हटलं जातं. पण अनेकांना माहिती असेलच की, आत्ताच नव्हे फारच पूर्वीपासून साऊथ चित्रपट आणि गाणी जगभरात पसंत केले जातात. यामध्ये अल्लू अर्जुनच्या ‘आर्या’ चित्रपटाचा आणि त्यातील गाण्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागले. अलीकडच्या काळातसुद्धा अनेक साऊथ गाणी आणि चित्रपट लोकप्रिय ठरत आहेत. (हे वाचा: बोनी कपूरच्या एक्स-पत्नीची खास मैत्रीण होती रविना, सेटवर श्रीदेवीने वाढवली जवळीकता, अशी झालेली गोची ) धनुषने टॉलिवूड-बॉलिवूड नव्हे तर हॉलिवूडपर्यंत आपली मजल मारली आहे. 2011मध्ये धनुष आणि श्रुती हसनचा ‘3’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील ‘व्हाय दिस कोलावेरी डी’ हे गाणं तुफान लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्याने तरुणांनाच नव्हे तर वयोवृद्धांनासुद्धा वेड लावलं होतं. या गाण्याने युट्युबवर अनेक रेकॉर्ड मोडीत काढत अफाट व्ह्यूव मिळवले होते. गाण्याचे लिरिक्स- **‘‘यो बॉय्ज़
** आइ एएम सिंगिंग सॉन्ग सूप सॉन्ग फ्लॉप सॉन्ग व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी व्हाय धिस कोलावेरी कोलावेरी कोलावेरी डी’’ अनेकांना आजही या गाण्याचा खरा अर्थमाहिती नाहीय. आज आम्ही तुम्हाला याबाबतच सांगणार आहोत. ‘कोलावेरी’ हा एक तामिळ शब्द आहे. हा शब्द दाक्षिणात्य भागात सर्रास वापरला जातो. कोलावेरी म्हणजे मर्यादेपलीकडील राग. ‘व्हाय दिस कोलावेरी डी’चा खरा अर्थ ‘का हा प्राणघातक रोष आहे, राग आहे’ असा होतो. चित्रपटात अभिनेत्रीक डून प्रेमात नकार पचवलेल्या अभिनेत्याने हे शब्द गाण्याच्या स्वरुपात म्हटल्याचे दाखवण्यात आले आहेत.
हे गाणं अभिनेत्री श्रुती हसन आणि धनुष यांनी स्वतः गायलं आहे. तर धनुषने स्वतः हे गाणं लिहलं आहे. आणि धनुषने आपली एक्स पत्नी आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत हे गाणं दिग्दर्शित केलं आहे.