JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Farhan Akhtar Wedding: कोण होती फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानी? का झाला होता घटस्फोट?

Farhan Akhtar Wedding: कोण होती फरहान अख्तरची पहिली पत्नी अधुना भबानी? का झाला होता घटस्फोट?

Farhan Akhtar Wedding: अभिनेत्याची पहिली पत्नी अधुना भबानी (Adhuna Bhabani) नेमकी कोण होती आणि त्यांचा घटस्फोट का झाला? हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेता   (Bollywood Actor)  फरहान अख्तर   (Farhan Akhtar)  आणि शिबानी दांडेकर   (Shibani Dandekar)  उद्या लग्नबेडीत  (Wedding)  अडकणार आहेत. दरम्यान त्यांच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. सध्या सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. यासर्व गोष्टीं दरम्यान अनेकांना फरहान अख्तरच्या पहिल्या पत्नीबद्दल   (Farhan Akhtar’s First Wife)  जाणून घ्यायची उत्सुकता लागली आहे. अभिनेत्याची पहिली पत्नी अधुना भबानी   (Adhuna Bhabani)  नेमकी कोण होती आणि त्यांचा घटस्फोट का झाला? हा विषयही पुन्हा चर्चेत आला आहे. कोण आहे अधुना भबानी- अधुना भबानी एक एक प्रसिद्ध सेलेब्रिटी हेयर स्टायलिस्ट आहे. तिने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये हेयर स्टायलिस्ट म्हणून काम केलं आहे. अधुना ही ‘बी ब्लंट’ या हेयर सलूनची मालकीन आहे. अधुनाचा जन्म लंडनमध्ये झाला होता. फरहान अख्तरशी पहिली भेट आणि लग्न- अधुना भबानी आणि फरहान अख्तर यांची पहिली भेट 1997 साली मुंबईमध्येच झाली होती. हे दोघे जुहूमधील एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. त्यांची भेट फरहानची बहीण झोया अख्तरने घडवून आणल्याचं सांगितलं जातं. यावेळी फरहान आपल्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाबद्दल काम करत होता. दरम्यान अधुनाही एक हेयर स्टायलिस्टच्या रूपात या चित्रपटाशी जोडली गेली होती. अधुना ही फरहान अख्तरपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. तरीसुद्धा त्यांच्यात खूप छान बॉन्डिंग झालं होतं. हे दोघेही एकेमकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघांनी तब्बल ३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं होतं.

संबंधित बातम्या

16 वर्षाच्या सुखी संसारानंतर घटस्फोट- फरहान अख्तर आणि अधुना भबानी यांना बॉलिवूडमधील एक सुपरफ्रेंडली रोमँटिक कपल म्हणून ओळखलं जात होतं. हे दोघे सतत विविध सोहळ्यांमध्ये दिसून यायचे. या दोघांना दोन मुलीसुद्धा आहेत.परंतु अचानक 2017 मध्ये त्यांनी कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल करत सर्वांनांच धक्का दिला होता. या दोघांनी आपला 16 वर्षांचा संसार एका झटक्यात संपवल्याने त्यांचे चाहते नाराज होते. परंतु ते आपल्या मुलींसाठी नेहमीच खास मैत्रीपूर्ण नातं अजूनही जोपासलं आहे. दरम्यान फरहान अख्तर आणि अधुनाचं नातं अभिनेत्याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तुटल्याचं म्हटलं जातं. परंतु या दोघांनी कधीही आपल्या घटस्फोटाचं कारण स्पष्ट केलेलं नाहीय. याकाळात फरहान अख्तरचं नाव अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि आदिती राव हैदरीसोबत जोडलं गेलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या