JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO: मालिकांमध्ये लगीन घाई! नेहा-यश, शांतनू-पल्लवीनंतर कोणती जोडी बांधणार लगीनगाठ?

PHOTO: मालिकांमध्ये लगीन घाई! नेहा-यश, शांतनू-पल्लवीनंतर कोणती जोडी बांधणार लगीनगाठ?

टेलिव्हिजनवर वेगळ्या विषयाच्या मालिका सुरू आहेत. प्रत्येक वाहिनीवर एक वेगळी मालिका, वेगळे कलाकार आणि वेगळी कथा पाहायला मिळते. मात्र सण समारंभ, उत्सव आले की मालिकांमध्येही ते दाखवले जातात. सध्या मराठी टेलिव्हिजनच्या प्रत्येक चॅनलवर लगीन घाई सुरू आहे. झी मराठी (Zee Marathi) स्टार प्रवाह (Star Pravah) कलर्स मराठी (Colors Marathi) ते नव्याने आलेल्या सन मराठी (Sun Marathi) वाहिनीवरील मालिकांमध्ये लगीन घाई जोरात सुरू आहे. नुकतच शांतनु आणि पल्लवीचं लग्न झालं तर नेहा यशही लग्नबंधनात अडकणार आहेत. नेहा - यश (Yash Neha) ते शांतनू- पल्लवीनंतर (Shantanu Pallavi) आणखी कोणती जोडी बांधणार लगीनगाठ! चला तर पाहूयात.

0113

कलर्स मराठीवर 'लेक माझी दुर्गा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेतील नुकतंच जयसिंग आणि दुर्गाचं लग्न झालं.

जाहिरात
0213

मालिकेतील दुर्गाची भूमिका आता अभिनेत्री रश्मी अनपट साकारणार आहे.

जाहिरात
0313

दुर्गा जयसिंहच्या लग्नात नवी दुर्गा प्रेक्षकांच्या भेटीला आली.

जाहिरात
0413

तर स्टार प्रवाहवरील 'स्वाभिमान' मालिकेतील सर्वांची लाडकी जोडी शांतनू पल्लवी यांचं लग्न झालं.

जाहिरात
0513

मोठ्या आईनं दिलेल्या शब्दानुसार शांतनू आणि पल्लवी यांचं पुन्हा थाटामाटात लग्न लावून दिलं आहे. त्यामुळे स्टार प्रवाहवरील मालिकेत सध्या शांतनू पल्लवीच्या लग्नाची चर्चा आहे.

जाहिरात
0613

लेक माझी दुर्गा मालिके आधीच कलर्स मराठीवरील 'बॉस माझी लाडाची' मालिकेतही लग्नाचा बार उडाला.

जाहिरात
0713

मिहीर आणि राजेश्वरी यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या.

जाहिरात
0813

प्रेक्षक ज्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत ते यश आणि नेहा यांच्या लग्नाची. झी मराठीवरील 'माझी तुझी रेशमीगाठ' मालिकेत यश आणि नेहाच्या लग्नाचा ग्रँड एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
0913

यश नेहाच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत. सिल्वासा येथे मालिकेचं शुटींग करण्यात आलं आहे.

जाहिरात
1013

स्टार प्रवाहवरील पिंकींचा विजय असो मालिकेतही लगीन घाई पाहायला मिळाली.

जाहिरात
1113

सन मराठी वाहिनीवरील 'जाऊ नको दूर बाबा' मालिकेत अर्पिता आणि गौरव यांचंही नुकतच लग्न झालं.

जाहिरात
1213

यशच्या लग्नात शेफाली आणि समीर यांचेही सुर जुळले आहेत. त्यामुळे येत्या भागात शेफाली आणि समीर यांचंही लग्न पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
1313

त्याचप्रमाणे अरुंधती आणि आशुतोषची मैत्री हळूहळू खुलू लागली आहे. काही दिवसात दोघांचं लग्न होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या