अभिनेता विवेक ऑबेरॉयने त्याच्या बदललेल्या आयुष्याविषयी खुलासा केला होता. पाहा त्याने काय म्हटलं आहे.
अभिनेता विवेक ओबेरॉय त्याच्या प्रोफेशनल करिअर व्यतिरिक्त त्याच्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोबतच त्याचं नातं त्यावेळी फार चर्चेचा विषय ठरलं होतं.
ऐश्वर्या शी ब्रेकअप झाल्यानंतर 2010 साली त्याने प्रियांका अलवा हिच्याशी विवाह केला होता. लग्नाच्या काही वर्षानंतर विवेकने लग्नानंतर आपला आयुष्य कास बदललं हे एका मुलाखतीत सांगितल होतं. तसेच लग्नापूर्वी काही गोष्टींनी आयुष्यात कसा फरक पडला होता यावरही तो बोलला होता.
तो म्हणाला, "प्रियांकाने माझ्या आयुष्यात प्रेम, सकारात्मकता, शांती आणि सुख आणल आहे. आमच्या लग्नाला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. एक माणूस म्हणून मी पूर्णपणे बदललो आहे. माझ्याकडे आता असं कोणीच नाही ज्यांचं मी तिरस्कार करेन, तिरस्कारासाठी माझ्याकडे जागा नाही."
प्रियंका मुळे आयुष्यात खूप बदल झाला असल्याचं ही ती म्हणाला. याशिवाय आधीपेक्षा तो अधिक जबाबदार झाल्याचंही तो म्हटला. व पूर्वीच जीवन आता विसरून तो संपूर्ण नवं आयुष्य जगत असल्याचं त्याने सांगीतल.
विवेक आणि प्रियांकाला आता दोन मुलंही आहेत. व ते सुखी संसार करत आहेत. प्रियंका ही सिनेसृष्टीत नाही पण अनेकदा विवेक सोबत ती काही कार्यक्रमांत स्पॉट होत असते. सोशल मीडियावर विवेक नेहमीच कुटुंबासोबत मुलांसोबत फोटो शेअर करत असतो.