मुंबई, 21 मे- विवेक ओबेरॉयने ट्विटरवर एक मीम शेअर करत एग्झिट पोल आणि ऐश्वर्या राय- बच्चनची थट्टा उडवली होती. त्याच्या या ट्वीटमुळे तो अडचणीतही सापडला होता. चहूबाजूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठत होती. विवेकच्या ट्वीटवर सोनम कपूरने उत्तर देत फालतू.. अर्थहीन असं प्रत्युत्तरही दिलं. एवढंच नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाने आणि काँग्रेस पक्षाने त्याला अटक करण्याची मागणीही केली होती. दरम्यान, हे प्रकरण चिघळतंय असं दिसताच विवेकने ट्विटरवर एक मेसेज शेअर करून जाहीर माफी मागितली. विवेकने ट्वीट करत म्हटलं की, ‘माझ्यामुळे एक जरी महिला दुखावली गेली असेल तर ती चूक सुधारलीच पाहिजे. मी ते ट्वीट डिलीट केलं असून, सर्वांची माफी मागतो.’
सनी लिओनी नाही तर ‘या’ अभिनेत्रीला पहिल्याच ऑडिशनला करावा लागला होता सेक्स सीन
याआधीही त्याने एक ट्वीट शेअर करत या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. विवेक म्हणाला की, ‘कधी आपल्याला पहिल्या नजरेत जे विनोदी आणि हलक फुलकं वाटतं तसंच ते इतरांना वाटेल असं नाही. मी गेली १० वर्ष २ हजारांहून अधिक वंचित मुलींचं सशक्तीकरण करण्याचं काम करत आहे. कोणत्याही महिलेचा अपमान होईल असा मी विचारही करू शकत नाही.’
लग्नानंतर एकटीच हनिमूनला गेली होती ‘या’ अभिनेत्याची पत्नी दरम्यान, विवेकने दुसऱ्या एका युझरचं मीम ट्विटरवर शेअर केलं होतं. या मीममध्ये विवेक स्वतः असून ऐश्वर्या राय, सलमान खान आणि अभिषेक बच्चनही दिसत होते. विवेकने हे मीम शेअर करत फक्त एग्झिट पोलचीच थट्टा उडवली नाही तर ऐश्वर्या रायचीही थट्टा उडवली होती. विवेकने शेअर केलेल्या मीममधील पहिल्या फोटोत सलमान आणि ऐश्वर्या दिसत होते. या फोटोला कॅप्शन दिलं गेलंय की, ओपिनियन पोल. दुसऱ्या फोटोमध्ये विवेक आणि ऐश्वर्या दिसत होते. या फोटोवर लिहिलं गेलं की, एग्झिट पोल. तर तिसऱ्या फोटोमध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत दिसत होते. या फोटोला कॅप्शन लिहिलं गेलं की ‘रिझल्ट’. SPECIAL REPORT: एक्झिट पोलनंतर सोशल मीडियावर मीम्सला उधाण