स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी ही मालिका अल्पावधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मालिकेतील अप्पू आणि शशांक यांची जाडी प्रेक्षकांना फार आवडते. मात्र मालिकेत आता ट्विस्ट आला असून अप्पू आणि शशांक घटस्फोट घेणार आहेत. त्यांच्या या निर्णयानं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याच वळणावर मालिकेत एका नव्या पात्राची एंट्री होणार आहे. काही दिवसांआधीच मालिकेत वीणा जगतापची एंट्री झाली होती. यावेळी येणारं नवं पात्र कसं असणार आहे आणि कोण साकारणार आहे जाणून घ्या.
अप्पू आणि शशांकच्या या निर्णयानंतर संपूर्ण कानेटकर फॅमिलीला धक्का बसला असून सगळेच अपूर्वा शशांकचा घटस्फोट थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
काही दिवसांपूर्वीच मालिकेत अभिनेत्री वीणा जगतापची एंट्री झाली होती. माई आणि दादांची मुलगी अवंतिकाची भूमिका वीणानं साकारली होती.
आता मालिकेत येणाऱ्या नव्या पात्राचं नाव दमयंती दुधखुळे असं असून ती विवाह सल्लागाराची भूमिका साकारणार आहे.
'मालिकेच्या नावाप्रमाणेच या मालिकेत मी एक छोटासा ठिपका असेन जो शशांक आणि अपूर्वाच्या नात्यात प्रेमाचे रंग भरण्याचा प्रयत्न करणार आहे', असं विशाखा सुभेदार भूमिकेविशयी बोलताना म्हणली.