JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विराट कोहलीचा Dinosaur Walk पाहिला का? सोशल मीडियावर Memes चा पाऊस

विराट कोहलीचा Dinosaur Walk पाहिला का? सोशल मीडियावर Memes चा पाऊस

सध्या सोशल मीडियावर हिट होत असलेलं मीम म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा ‘डायनोसॉर वॉक’.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22 मे : लॉकडाऊनच्या काळात मीम बनवणाऱ्यांनी सोशल मीडियावर खूपच प्रसिद्धी कमावली आहे. अगदी कोणत्या गोष्टीचं मीम बनेल हे काही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर हिट होत असलेलं मीम म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा ‘डायनोसॉर वॉक’. अगदी काहीच दिवसांपूर्वी अनुष्का शर्माने तिच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर विराटचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिलं आहे की, ‘पळून गेलेल्या डायनोसॉर मी पाहिलाय’. यामध्ये विराट कोहली डायनोसॉरची चाल तर चालत आहेच पण एक विचित्र आवाज देखील काढत आहे. विराटच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर क्रिएटीव्हिटीला तर उधाण आहे आहे. कुणी याला ‘अनुष्का पार्क’ म्हणत आहे तर कुणी हृतिक रोशनच्या ‘its magic’ गाण्याबरोबर विराटचा फोटो एडिट केला आहे. एकंदरितच हे सर्व मीम्स हसून हसून पोट दुखायला लावणारे आहेत.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

संकलन, संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या