मुंबई, 27 फेब्रुवारी : झी मराठीची लोकप्रिय मालिका ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ आता हळूहळू शेवटाकडे वळत आहे. सध्या या मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा काळ दाखवला जात आहे. असं असतानाही प्रेक्षकांचं या मालिकेवरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये याचा अनुभव आला. फक्त जाणत्यांनाच नाही तर अगदी लहान मुलांनाही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल किती प्रेम आहे हे या व्हिडीओमध्ये दिसून आलं. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन लहान मुलं एक रुममध्ये खोळताना दिसत आहे. पण अचानक टीव्हीवर स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचं टायटल साँग सुरू होतं आणि ही दोन्ही मुलं खेळ थांबवून टीव्हीकडे धाव घेतात. यावरुन या मुलांना या मालिकेबद्दल किती प्रेम आहे हे समजतं. राणा दग्गुबातीनं 30 किलो वजन केलं कमी, आता असा दिसतो ‘बाहुबली’चा भल्लालदेव
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहे. ज्यात एका युजरनं या मुलांची माहिती देत ही मुलं रोज न चुकता ही मालिका पाहत असल्याचं सांगितलं आहे. ‘या दोन्ही मुलांची नाव अभिराज आणि श्रीराज अशी आहेत. सांगली जिल्ह्यातील हे 2 वर्षांचे दोन्ही चिमुकले स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेचे टायटल साँग सुरू झाल्यावर घरात असतील तिथून पळत टीव्ही समोर येतात आणि मालिकेचा एपिसोड संपत नाही तोपर्यंत तिथून हलत सुद्धा नाहीत.’ असं या युजरनं कमेंटमध्ये लिहिलं. बॉलिवूडमधील आणखी एका कपलचा काडीमोड, 10 वर्षांचा संसार मोडला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचे भाग वगळणार असल्याचा दावा शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी केला होता. मात्र, त्यावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी, ‘मुळात गेली 2.5 वर्षे मालिका सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे. परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. अशी प्रतिक्रिया दिली होती.
‘मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी ‘झी मराठी’ वाहिनीचा असेल. संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचे भाग प्रदर्शित करू नये, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली होती. अखेर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संभाजी महाराजांच्या हत्येचा भाग वगळणार असल्याचे आश्वासन डॉ.अमोल कोल्हे यांनी दिले असल्याचे अर्जुन खोतकर यांनी सांगितले आहे. मात्र, आपण असे बोललो नसल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्याची तुलना होतेय तिच्याच लेकीशी, भावाच्या लग्नात केली धम्माल