मुंबई, 28 फेब्रुवारी : मणिरत्नम यांच्या ‘अंजली’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी तमिळ अभिनेत्री गायत्री सईने पिझ्झा डिलिव्हरी बॉयविरोधात तक्रार दाखल केली आहे. या पिझ्झा डिलिव्हरी बॉयने तिचा फोन नंबर व्हॉट्सअॅपच्या अडल्ट ग्रुपवर शेअर केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. गायत्रीने स्वत: याविषयीची माहिती ट्विटरवर दिली असून त्या पिझ्झा डिलिव्हरी बॉयचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. गायत्रीनं तिच्या ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं, ‘डॉमिनॉज पिझ्झाच्या चेन्नईमधल्या डिलिव्हरी बॉयने 9 फेब्रुवारी रोजी माझा फोन नंबर व्हॉट्सअॅपच्या एका अडल्ट ग्रुपवर शेअर केला आहे. मला सतत फोन कॉल्स आणि मेसेज येत होते. यामुळे मला फार मनस्ताप सहन करावा लागला’ या सोबत गायत्रीने व्हॉट्स अॅप मेसेजचे स्क्रीनशॉटसुद्धा पोस्ट केले. या पिझ्झा डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी त्याची चौकशी सुरू आहे. अमृता खानविलकरचा स्टंट पाहून आईनं लावला डोक्याला हात, हा VIDEO एकदा पाहाच
गायत्रीनं त्यानंतर पुन्हा एक ट्वीट करत तिची केस महिला ब्रांचकडे सोपवल्याचं सांगितलं. गायत्री सईने प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘अंजली’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. एकेकाळी पती पासून वेगळी झाली होती भाग्यश्री, 30 वर्षांनी केला धक्कादायक खुलासा