मुंबई, 11 एप्रिल : चीनपासून सुरू होऊन जगभरात पसरलेल्या कोरना व्हायरसनं आता सगळीकडेच थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस या व्हायरसवर नियंत्रण मिळवणं खूप कठीण होत चाललं आहे. प्रत्येक दिवशी कोरोना बाधितांची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. आता या व्हायरसमुळे नुकतंच एका अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हिलेरी हीथ हिचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. हिलरी हीथ 74 वर्षांच्या होत्या. मागच्या 1 आठवड्यापासून हिलेरी कोरोना व्हायरसवर उपचार घेत होत्या. मात्र अखेर त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा अलेक्स विलियम्सनं दिली. हिलेरी यांनी ‘विचफाइंडर जनरल’ (witchfinder general) या सिनेमात काम केलं होतं. हॉलिवूड रिपोर्टनुसार हिलेरी यांचा मुलगा अलेक्स यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून हिलेरी यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली.
हिलेरी यांच्या अगोदर सिंगर जॉन प्राइन, एडम स्लेजिंजर अँड्रू जॅक, मार्क ब्लम आणि केन शिमूरा या दिग्गज कलाकारांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. हिलेरी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. हिलरी यांच्या हॉलिवूड करिअर बद्दल बोलायचं तर 1968 मध्ये हिलेरी यांनी मिशेल रीव्स यांच्या ‘विचफाइंडर जनरल’ (witchfinder general) या सिनेमातून डेब्यू केला होता. पण काही वर्षांतच त्यांनी अभिनय क्षेत्राला अलविदा केलं. याशिवाय त्यांनी An Awfully Big Adventure हा सिनेमा प्रोड्यूर केला होता. (संपादन : मेघा जेठे.) 25 मुलींच्या ऑडिशननंतर दीपिका झाली रामायणाची सीता, अशी झाली होती निवड लॉकडाऊनमध्ये आपल्या LOVE सोबत नाश्ता करताना दिसला सलमान, पाहा VIDEO