JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘रणभूमीवर जिंकण्याआधी मनभूमीवर विजय मिळवा’, पाहा Vijeta Teaser

‘रणभूमीवर जिंकण्याआधी मनभूमीवर विजय मिळवा’, पाहा Vijeta Teaser

सुबोध भावेचा बहुचर्चित सिनेमा ‘विजेता’चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 फेब्रुवारी : अभिनेता सुबोध भावे सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. येत्या काळात सुबोधचे विजेता आणि भयभीत असे दोन सिनेमा रिलीज होत आहेत. यातील विजेता या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. ज्याची मागच्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. विजेताच्या टीझरमध्ये सुबोध भावेचा दमदार आवाज ऐकू येत आहे. हा सिनेमा महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानावर भाष्य करणार आहे. ‘महाराष्ट्राची ताकद नाही तर उमेद कमी पडतेय’ असे अनेक डायलॉग मनाचा ठाव घेतात.

सुबोध भावे त्याच्या चाहत्यांसाठी नेहमीप्रमाणेच काही तरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या वर्षी तुला पाहते रे या मालिकेतून त्यानं पुन्हा छोट्या पडद्यावर पदार्पण केले होतं. ही मालिका कमालीची गाजली. त्यानंतर त्याचा काशीराम घाणेकर हा सिनेमा सुद्धा प्रचंड गाजला होता.

महाराष्ट्राच्या क्रिडा क्षेत्रातील योगदानावर भाष्य करणाऱ्या या सिनेमात सुबोध भावे, सुशांत शेलार, पूजा सावंत, तन्वी किशोर दिप्ती धोत्रे, प्रितम कागणे, मानसी कुलकर्णी, माधव देवचक्के यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमाचं दिग्दर्शन अमोल शेटगे यांनी केलं असू हा सिनेमा येत्या 12 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या