JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Vijay Deverakonda ने जगातील सर्वात 'या' श्रीमंत व्यक्तीला दिलं निमंत्रण, अभिनेत्याचे Tweet व्हायरल

Vijay Deverakonda ने जगातील सर्वात 'या' श्रीमंत व्यक्तीला दिलं निमंत्रण, अभिनेत्याचे Tweet व्हायरल

चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकणारा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) सध्या एका वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला आहे.

जाहिरात

Vijay Deverakonda

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 17 जानेवारी: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda ) चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. फक्त टॉलिवूडचं नाही तर बॉलिवूडमध्येही त्याचे लाखो चाहते आहेत. अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांची मनं जिंकणारा विजय सध्या एका वेगळ्याच  गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याने थेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क(Elon Musk)ला आपल्या शहरात म्हणजेच तेलंगणामध्ये येण्याचे ट्विटरद्वारे निमंत्रण दिले आहे. वियय देवरकोंडाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी एलॉन मास्कला एक पत्र लिहित तेलंगणामध्ये एक युनिट स्थापन करण्याची विनंती केली आहे. एलोन मस्क(Elon Musk)ला टॅग करत तुम्ही हैदराबाद-भारतात या. तुमचे इथे येणे चकित करणारे असेल. आणि तेलंगणातील सरकारही जबरदस्त आहे..अशा आशयाचे ट्विट विजयने केले आहे.

संबंधित बातम्या

त्याचे हे ट्विट दोन दिवसांपूर्वीचे असून सध्या ते सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याच्या या ट्विटने त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. विजयच्या या ट्विटला एलॉनमस्क रिप्लाय देतात का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विजयपूर्वी, सर्व प्रथम पश्चिम बंगाल आणि तेलंगणातून टेस्ला सीईओला संदेश पाठवण्यात आला होता. तेलंगणाचे उद्योग मंत्री के.टी. रामाराव यांनी थेट एलॉन मस्कला संबोधित करत ट्विट केले होते की, ‘एलॉन, मी तेलंगणाचा उद्योग मंत्री आहे आणि तेलंगणाला (Telangana) भारतात टेस्लाची स्थापना करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कंपनीसोबत भागीदारी करण्यासाठी तयार आहोत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले हेते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या