JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / विजय देवरकोंडाने Liger फ्लॉपनंतर परत केले नाहीत 7 कोटी,फोनही बंद? ट्विटमधून मोठा दावा

विजय देवरकोंडाने Liger फ्लॉपनंतर परत केले नाहीत 7 कोटी,फोनही बंद? ट्विटमधून मोठा दावा

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा गेल्या काही दिवसांत आपल्या ‘लायगर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला होता. या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 22  सप्टेंबर-   साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा गेल्या काही दिवसांत आपल्या ‘लायगर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला होता. या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. विजय देवरकोंडा, अनन्या पांडे, राम्या कृष्णन, माईक टायसन अशी तगडी स्टारकास्ट असूनदेखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वाईटरित्या फ्लॉप ठरला. त्यामुळे विजयला बॉलिवूडमध्ये हवी तशी सुरुवात मिळाली नाही. त्यामुळे विजय देवरकोंडासोबत त्याचे चाहतेसुद्धा प्रचंड निराश झाले आहेत. परंतु आता विजय एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. विजय देवरकोंडा आणि त्याच्या चाहत्यांना ‘लायगर’ या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. परंतु या सर्व अपेक्षा व्यर्थ ठरल्या. विजयच्या बॉयकॉट बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्याबाबत सोशल मीडियावरुन रोष व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान 100 कोटींहून अधिक बजेटमध्ये बनलेला ‘लायगर’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कलेक्शन करू शकला नाही.अशा परिस्थितीत आता सोशल मीडियावर अभिनेता विजयबाबत नवा वाद पाहायला मिळत आहे.ट्विटरवर असा दावा केला जात आहे की, ‘लायगर’ फ्लॉप झाल्यानंतर अभिनेत्याने 7 कोटी रुपये परत देण्याचं आश्वासन दिलं होतं, जे त्याने अद्याप परत दिलेलं नाहीय. आणि आता त्याचा फोनही बंद आहे. पाहूया नेमकं काय घडलंय. बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊनही विजय देवरकोंडाच्या ‘लायगर’ चित्रपटाचं नाव ट्विटरवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये आहे. या कीवर्डवर क्लिक करुन पाहिल्यानंतर लोक माहिती देत ​​आहेत की हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर काही लोक चित्रपटातील सीन्सही शेअर करत आहेत. दरम्यान, एक ट्विट समोर आलं आहे. या ट्विटने नवा वाद निर्माण केला आहे. या ट्विटनुसार सांगण्यात आलं आहे की, फिल्म डिस्ट्रुब्युटर निर्मात्यांकडे कमीत-कमी रकमेची मागणी करत आहेत. अशात आता अभिनेता विजय देवरकोंडाने आपला फोन बंद करुन ठेवला आहे. तो डिस्ट्रिब्युटर्सना कोणताही प्रतिसाद देत नसल्याचा आरोपही ट्विटमध्ये करण्यात आला आहे.

**(हे वाचा:** KBC 14: 1 कोटी जिंकूनही करोडपती नाही बनली कविता चावला; काय आहे नेमकं प्रकरण? ) तसेच या युजर्सने अभिनेत्याच्या 7 कोटी परत देण्याच्या विधानाबद्दल बोलताना पुढे लिहलंय की, ‘विजय देवरकोंड 7 कोटी परत करणार असल्याच्या रिपोर्ट त्याच्या पीआर टीमने पैसे देऊन प्रसारित केला होता. प्रत्यक्षात त्यांनी एक परत केलेला नाहीय. मात्र, या युजरच्या बोलण्यात किती तथ्य आहे हे येणारा काळच सांगेल. या ट्विटला न्यूज18 लोकमतने दुजोरा दिलेला नाहीय. या ट्विटवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीय. त्यामुळे या ट्विटचं सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल अशी अपेक्षा केली जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या