मुंबई,28ऑक्टोबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि नताशा दलाल (Natasha Dalal) यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. त्यांचे चाहते अनेकदा या जोडीच्या रोमँटिक फोटोंची वाट पाहत असतात. अलीकडेच करवा चौथच्या दिवशी वरुणने पत्नी नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. पण हे फोटो समोर आल्यापासून चाहत्यांनी या जोडप्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. लोकांनी वरुणला थेट प्रश्न विचारला आहे की त्याची पत्नी नताशा प्रेग्नंट आहे का? आणि तो लवकरच वडील होणार आहे का?
या रविवारी वरुण धवनने पत्नी नताशासोबत करवा चौथ साजरी करताना आणि चंद्र पाहतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. लग्नानंतरही वरुण त्याचं आयुष्य आणि नताशाचं आयुष्य खूप पर्सनल ठेवतो. तो आपल्या पत्नीसोबतची निवडक फोटोच सोशल मीडियावर शेअर करत असतो. करवा चौथवर शेअर केलेल्या फोटोमध्ये वरुण नताशाच्या पोटावर हात ठेवल्याचं दिसत आहे.हा फोटो पाहून लोकांनी अभिनेत्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.सोशल मीडियावर सध्या नताशा आणि वरुण यांच्या या फोटोबद्दल जोरदार फोटो प्रमाणात व्हायरल होत आहे.
वरुण-नताशा वेडिंग- वरुण आणि नताशा या वर्षी जानेवारीमध्ये विवाहबद्ध झाले होते. 24 जानेवारी रोजी अलिबागमधील एका रिसॉर्टमधून बाहेर पडल्यानंतर या जोडप्याने मीडियासमोर पती-पत्नीची पोज दिली होती. वरुण आणि नताशाचे हे लग्न अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. आणि या लग्नाची कोणतीही माहिती चाहत्यांसमोर आली नव्हती. थेट लग्नानंतरच या दोघांचे वेडिंग फोटो समोर आले होते. नताशा आणि वरूण हे स्कुल फ्रेंड आहेत. ते दोघे बऱ्याच वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. **(हे वाचा:** स्तनपानाच्या फोटोमुळे अभिनेत्री झाली होती ट्रोल ; आता पुन्हा केला फोटो शेअर ) वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर वरुण धवन शेवटचा ‘कुली नंबर 1’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान दिसली होती. सध्या वरुण त्याच्या आगामी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुणही कोरोनाच्या विळख्यात आला आहे. ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात वरुणसोबत कियारा अडवाणी दिसणार आहे.