JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट !

मराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट !

बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये महराष्ट्राच्या लाडक्या ‘आऊ’ म्हणजेच उषा नाडकर्णी यांना घराबाहेर जावं लागलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जुलै : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील ज्या सदस्याला कमी मतं मिळालं त्याला बाहेर जाणं अनिवार्य होतं. बिग बॉस मराठीच्या घरामधून या आठवड्यामध्ये महराष्ट्राच्या लाडक्या ‘आऊ’ म्हणजेच उषा नाडकर्णी यांना घराबाहेर जावं लागलं आहे. या आठवड्यामध्ये स्मिता आणि आऊ डेंजर झोनमध्ये आल्या होत्या.  उषाजींना निरोप देताना शर्मिष्ठा, मेघा, पुष्कर, सई, आस्ताद सगळेच खूप भाऊक झाले. तेव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? कोणते टास्क सदस्यांना मिळणार ? मेघा, पुष्कर आणि सई यांच्यातील वाद मिटतील का ? हे बघणे रंजक असणार आहे. हा आठवडा पुष्कर, मेघा, सई, शर्मिष्ठा आणि आऊ यांच्या ग्रुपसाठी थोडा तणावाचा आणि वाद विवादांचा ठरला. ज्यामध्ये सई आणि पुष्कर मेघा वर बरेच नाराज दिसले. सई आणि पुष्कर यांनी मेघाला बरेच बोलून दाखवले. परंतु आता सईने मेघाला आपण सगळे विसरून जाउया असे सांगितले असून मेघाने सईला असे सांगितले आहे पुष्कर जे काही माझायाबद्दल बोलला ते मी नाही विसरू शकत.

‘संजू’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम, 2 दिवसांची कमाई…!

त्यामुळे येत्या आठवड्यामध्ये पुष्कर, मेघा, सई, शर्मिष्ठा यांच्यातील वाद मिटतील का ? हे बघणे रंजक असणार आहे. आता येणारे सगळेच आठवडे महत्वपूर्ण असून बिग बॉस मराठीच्या घरातील प्रत्येक सदस्याला स्वत:साठी खेळण्याची वेळ आली आहे. उषा नाडकर्णी या आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडल्या. तेव्हा महेश मांजरेकर यांनी बोलताना सांगितले की, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आऊ यांची खूप आठवण येईल. या घरामध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या