JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मोबाइलचा अतिवापर पडला महागात, अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला झाला गंभीर आजार

मोबाइलचा अतिवापर पडला महागात, अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला झाला गंभीर आजार

सतत मोबाइलवर काम करणं अभिनेत्री उर्वशीला महागात पडलं असून ती सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 2 मे : मोबाइल फोनचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात एवढा वाढला आहे की, आपण त्याच्याशिवाय दोन मिनिटं सुद्धा राहू शकत नाही. लॉकडाऊनमुळे सर्वजण घरीच असल्यानं सध्या सर्वांकडूनच मोबाइलचा अतिवापर होताना दिसत आहे. एकमेकांशी बोलण्यासाठी सर्वजण सध्या फोनवर अवलंबून आहेत. याशिवाय इंटरनेटवर विविध वेब सीरिज, सिनेमा पाहण्यासाठी आपण फोनचा वापर करत आहोत. ज्यामुळे त्याचा परिणाम नकळतपणे आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे. मोबाइलचा असाच अतिवापर करणं एका अभिनेत्रीला महागात पडलं असून ती सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकिया सध्या टेनिस एल्बो या आजाराचा सामना करत आहे. उर्वशी सध्या Trending Now नावाचा एका व्हर्चुअल चॅट करत आहे. उर्वशी सांगते, सध्या लॉकडाऊन असल्यानं सर्व काम स्वतःची स्वतः करावी लागत आहेत. फोनवर सतत काम केल्यामुळे सध्या मला टेनिस एल्बो या आजाराचा सामना करावा लागत आहे. स्पॉटबॉय-ईशी बोलताना उर्वशीनं सांगितलं, काही दिवसांपूर्वीच मला टेनिस एल्बोचा त्रास होऊ लागला होता. हा आजार सतत फोन पकडल्यानं झाला होता. कारण मला माझ्या शोचं सर्व काम फोनवर करावं लागतं. माझा शो मी स्वतः एडिट करते. या शोचं सर्वाधिक एपिसोड हे मी स्वतः एडिट केलेले आहेत. मेघा घाडगेनं घरात राहून फेसबुक लाइव्हवर केली लॉकडाऊन लावणी, पाहा VIDEO

उर्वशी सध्या ज्या समस्येचा सामना करत आहे ती बऱ्याच लोकांना फोनच्या अतिवापरानं किंवा सतत फोनचा वापर केल्यानं होत असते. हातांच्या जॉइंट्समध्ये बाहेरच्या बाजूनं वेदना होतात. ज्याला वैज्ञानिक भाषेत टेनिस एल्बो म्हटलं जातं. जर हा आजार झाला असेल तर सुरुवातीलाच सावध व्हा. नाहीतर कदाचित यापेक्षा जास्त वेदना होऊ शकतात. बराच वेळ फोनचा वापर, चुकीच्या पद्धतीनं बाइक चालवल्यानं किंवा मांसपेशी आणि हाडांमध्ये कमकुवतपणा असल्यास सुद्धा हा आजार होऊ शकतो. Instagram च्या माध्यामातून महिन्याला लाखो रुपये कमावते ही मॉडेल! या आजाराचं सुरुवातीलाच निदान झालं नाही तर याचे गंभीर परिणाम होतात. यामुळे प्रचंड वेदना आणि अवयवांवर सुज येते. सामान्यपणे खेळाडू आणि तरुणांना खेळताना किंवा व्यायाम करताना मनगट, बोटंच्या हालचालींमुळे मसल्सवर ताण आल्यानं कोपरात वेदना होतात किंवा सूज येते. (संपादन- मेघा जेठे.) स्वप्नील जोशीची रामानंद सागर यांच्याशी अशी झाली होती पहिली भेट!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या