JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / वाद पेटला! उर्मिलाचं 'पंगा' गर्ल कंगनाला खुलं चॅलेंज; आता तर हे करुनच दाखव!!!

वाद पेटला! उर्मिलाचं 'पंगा' गर्ल कंगनाला खुलं चॅलेंज; आता तर हे करुनच दाखव!!!

कंगनाने उर्मिलाला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटल्यानंतर आता उर्मिलानेही कंबर कसली आहे..

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 17 सप्टेंबर : बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौत (Kangana Ranaut) हिची आता ‘छम्मा-छम्मा’ गर्ल उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिच्यासोबत तू तू मे मे सुरू आहे. उर्मिला मातोंडकरने जया बच्चन वक्तव्याला पाठिंबा देत कंगना रनौत (Kangana Ranaut) वर निशाणा साधला होता. यानंतर आता कंगनाने उर्मिलाला ‘सॉफ्ट पॉर्न स्टार (Soft Porn Star)’ म्हटले आहे. यानंतर उर्मिलाने कंगनाला पुन्हा एकदा सवाल विचारला आहे. उर्मिला मातोंडकरने कंगना रनौतला आता खुलं आव्हान दिलं आहे. तिने ड्रग्ज प्रकरणात सामील असलेल्या सेलिब्रिटींची नावं पुराव्यासह द्यावीत. यापूर्वी उर्मिलाने कंगनाच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केला आहे. कंगनाला चित्रपटसृष्टीतील प्रत्येकासोबत अडचण का आहे? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. हे ही वाचा- ‘सॉफ्ट पॉर्न स्टार’ कमेंटविरोधात बॉलिवूड एकत्र; कंगनाला लगावला सणसणीत टोला मातोंडकर म्हणाली की, संपूर्ण बॉलिवूड ड्रग्समध्ये अडकल्याचे सांगण्यापेक्षा कंगनाने त्या मोठ्या फिल्म स्टार्सच्या नावांचा खुलासा करावा, ज्यांच्या ड्रग्स प्रकरणात समावेश आहे. उर्मिला पुढे म्हणाली, नावं कुठे आहेत? माझी इच्छा आहे की कंगनाने पुढे यावे आणि अशा सेलिब्रिटींची नावं सांगावीत व त्यांचा पर्दाफाश करावा. यासाठी सर्वात आधी मी तिला थम्स अप करेन.

संबंधित बातम्या

कंगनाने आज सोशल मीडियावर उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्न स्टार असा उल्लेख केला आहे. त्यावरुन सध्या मोठा गदारोळ झाला असून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उर्मिलाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या आहेत. इंडिया टुडे चॅनलसोबत बातचीत करताना उर्मिलाने सांगितले की, तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून ज्या क्षेत्रात काम करीत आहात अचानक तुम्हाला येथील प्रत्येक व्यक्तीची अडचण वाटू लागते. तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल की तुम्हाला सातत्याने विक्टिम कार्ड खेळत न थांबता म्हणायचं आहे..की मी विक्टिम आहे…

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या