Urfi Javed
नवी दिल्ली, 23 जानेवारी: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अनेकदा तिच्या ड्रेसिंग वेअरमुळे तिला ट्रोलींगचा सामना करावा लागतो. दरम्यान, ती सध्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ (yogi adityanath) यांच्या एका बैठकीमध्ये तिने हजरे लावली असल्याची दिसून आली. तिच्या या फोटोमुळे बॉलीवूड आणि राजकीय वर्तुळात चर्चला उधाण आले. दरम्यान, तिने स्वतःच बैठकीमधील एक फोटो शेअर करत उपस्थित झालेल्या प्रश्नाना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. उर्फी जावेदनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका फोटो शेअर करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीत सहभागी झाल्याचा दावा केला आहे. उर्फीला हा फोटो तिच्या चाहत्यानं पाठवलेला आहे. ज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बैठक घेताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर सुरू असलेल्या टीव्ही त्याचवेळी उर्फीशी संबंधीत बातमी दाखवली जात आहे.
Urfi Javed
‘योगीजींसोबत या बैठकीत सहभागी झाल्याचा आनंद आहे. कोणीतरी हा फोटो मला पाठवला जो पाहिल्यानंतर मला खूप हसू आलं.’अशी कॅप्शन देत तिने हा फोटो आपल्या स्टोरीला शेअर केला आहे. तिच्या या कॅप्शनमुळे चाहते चांगलेच संभ्रमात पडले आहेत. नक्की काय आहे प्रकरण असा प्रश्न उपस्थित होत आहे. मूळची लखनऊची असलेली उर्फी जावेदनं 2016 मध्ये ‘बड़े भैया की दुल्हनिया’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पाच वर्षांच्या आपल्या अभिनय कारकिर्दीत तिने जवळपास १० मालिकांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच ती नव्यानं सुरू झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. ज्यानंतर तिच्या लोकप्रियतेत भर पडली आहे.