JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अरे हिला आवरा....; उर्फीचा हा नवीन प्रताप पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, Video Viral

अरे हिला आवरा....; उर्फीचा हा नवीन प्रताप पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, Video Viral

बिग बॉस ओटीटी फेम उर्फी ​​जावेद तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. त्यामुळे उर्फीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिच्या अतरंगी आणि विचित्र ड्रेसिंगमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते.

जाहिरात

उर्फी जावेद

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑक्टोबर : बिग बॉस ओटीटी फेम  उर्फी ​​जावेद तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. त्यामुळे उर्फीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. तिच्या अतरंगी आणि विचित्र ड्रेसिंगमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते.उर्फीला ड्रेसिंग सेन्सवरुन अनेकदा ट्रोल केले जाते. मात्र ती याकडे दुर्लक्ष करत आपली क्रिएटिव्हिटी दाखवत असते. वेगवेगळ्या वस्तूपासून उर्फी कधी कोणता ड्रेस बनवेल याचा काही नेम नसतो. नेहमीच काहीतरी नवीन कपडे बनवण्याचा उर्फीचा उद्देश खरा ठरतो आणि तिची फॅशन, तिचे कपडे पाहून चाहते कायमच थक्क होतात. आता पुन्हा उर्फीनं नवा प्रयोग करत ड्रेस बनवला आहे. याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावेळी उर्फीने जुन्या कॅसेटच्या रीलमधून ड्रेस बनवला आहे. याचा एक व्हिडीओ उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये उर्फी एका म्युझिक सिस्टमजवळ बसलेली दिसत आहे. त्याच्यासोबत काही जुन्या कॅसेट्सही दिसतात. उर्फी या कॅसेट्स उचलू लागते आणि यापासून ड्रेस बनवते. या कॅसेट रीलपासून उर्फीने शॉर्ट स्कर्ट आणि ब्रॅलेट टॉप बनवलेला दिसत आहे. उर्फीचा हा लूक खूपच आकर्षक दिसत आहे. काही लोक इथे तिच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक करत आहेत, तर अनेकजण तिच्या विचित्र ड्रेसिंग सेन्ससाठी तिला ट्रोल करत आहेत. अरे हिला आवरा, अशा प्रकारच्या कमेंट करत आहेत.

संबंधित बातम्या

उर्फी दररोज हटके ड्रेस परिधान करून मीडियासमोर येत असते. ती कधी काचेपासून, कधी वायरीपासून कधी ब्लेडपासून तर कधी गोणपाटपासून बनलेले ड्रेस परिधान करून सर्वांनाच थक्क करत असते. काहींना तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक वाटतं तर काही लोक तिला वाईटरित्या ट्रोल करत असतात.

दरम्यान, उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून आपल्या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आली होती. गेल्या 11 ऑक्टोबरला उर्फी जावेदचा ‘हाय हाय ये मजबुरी’ हे गाणं रिलीज झालं होतं. या गाण्याची प्रचंड चर्चा झाली होती. मात्र आता याच गाण्यामुळे उर्फी अडचणींतही सापडली असल्याचं समोर आलंय. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार एका व्यक्तीने उर्फीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने उर्फीवर तिच्या नवीन गाण्यात अतिशय लहान आणि अयोग्य ड्रेस घातल्याचा आरोप करत हा गुन्हा दाखल केला आहे. उर्फीने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या