JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Urfi javed : नग्न होण्याचं इतकं वेड का? ट्रोलर्सच्या प्रश्नाचं उर्फीनं दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही माराल डोक्याला हात

Urfi javed : नग्न होण्याचं इतकं वेड का? ट्रोलर्सच्या प्रश्नाचं उर्फीनं दिलेलं उत्तर वाचून तुम्हीही माराल डोक्याला हात

प्रत्येक वेळी नवीन आणि बोल्ड लुक घेऊन उर्फी जावेद समोर येत असते. अशातच यावेळीही उर्फीनं नवा आणि हटके, बोल्ड लुक केला आहे. पण त्यापेक्षा जास्त यावेळी तिने ट्रोलरला दिलेल्या भन्नाट उत्तराची जास्त चर्चा होतेय.

जाहिरात

Urfi javed new look

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 ऑगस्ट : उर्फी जावेद म्हटलं तरी पहिली गोष्ट डोळ्यासमोर येते ती म्हणजे तिची अंतरंगी फॅशन. निरनिराळ्या फॅशन सेन्सनं उर्फी नेहमीच चर्चेत असते. तिच्या हटके लूक आणि हटके स्टाईलवर चाहत्यांच्या नजरा नेहमीच  खिळून असतात. तिचे फोटो क्षणार्धात व्हायरल होतात.  मात्र तिच्या अतरंगी स्टाईलमुळे ती जेवढी चर्चेत असते तेवढीच ती ट्रोलरच्या निशाण्यावरही असते. अनेकवेळा तिला तिच्या ड्रेसिंगमुळे ट्रोल केलं जातं. मात्र उर्फी ट्रोलकडे लक्ष न देता नेहमी नवनवीन ड्रेस, स्टाईल तयार करत असते. अशातच पुन्हा एकदा उर्फी जावेद सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. चर्चेत येण्याचं कारण तिचा नवीन फॅशनेबल ड्रेसच आहे. पण यावेळी तिने एका ट्रोलरला भन्नाट उत्तर दिलं आहे. त्याची सध्या चर्चा होत आहे. उर्फीनं नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिचा नवा लूक पहायला मिळतोय. नव्या लूकमध्ये उर्फीचा नेहमीप्रमाणेच अतिशय हटके ड्रेस पाहायला मिळतोय.  तिने अतिशय शॉर्ट स्किन कलरचा ड्रेस घातला आहे, ज्यामध्ये ती खूप बोल्ड दिसत आहे. या ड्रेसमध्ये ती चाहत्यांचा लक्ष वेधून घेत आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवरून हा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पण त्यावर एकाने केलेली कमेंट आणि उर्फीने त्याला दिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे.

संबंधित बातम्या

तिच्या या लेटेस्ट फोटोवर एका ट्रोलरने, ‘तुला सतत असे कपडे घालायला का आवडत असेल’ अशी कमेंट केली. त्यावर उर्फीने भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. तिने लिहिलं आहे कि, ‘कारण मी असे कपडे घातल्यामुळेच तू मला फॉलो करत आहेस आणि माझे फोटो बघत आहेस.’ उर्फीच्या या उत्तराने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हेही वाचा - Shashank ketkar : मालिका रंगात आलेली असताना शशांक केतकर अचानक गेला परदेशात; काय आहे कारण? दरम्यान गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. तिला येणाऱ्या धमक्यांमुळे सध्या उर्फी चर्चेत आहे. पण तिला धमक्या देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी नुकताच जेरबंद केलं आहे. दरम्यान, उर्फी जावेदनं शेअर केलेला हा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून लाईक्सचाही वर्षाव होत आहे. उर्फीच्या क्रिएटिव्हिटीची दादा द्यावी लागेल कारण ती कुठून काय संकल्पना घेऊन येते आणि नवनवीन कपडे बनवते कुणीही तर्क लावू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या