मुंबई, 15 ऑक्टोबर : ‘बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT)’ मधून बाहेर आल्यापासून उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद नेहमी तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते. या बोल्ड फोटोमुळे अनेकदा ती सोशल मीडियावर (Social Media) ट्रोलदेखील होते. आता याच उर्फीमुळे राखी सावंतही चर्चेत आली आहे. उर्फीचा आज बर्थडे (Urfi Javed birthday). तिच्या बर्थडे पार्टीत राखी सावंत सैराट झाली (Rakhi sawant at Urfi Javed birthday). उर्फीने प्री बर्थडे पार्टीचं आयोजन केलं होतं (Urfi Javed birthday party). या पार्टिला ड्रामा क्वीन राखी सावंतने (Rakhi Sawant) हजेरी लावली होती. राखी या पार्टीत धमाल करताना दिसली. या पार्टीचे काही व्हिडिओ राखीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राखी सावंतने उर्फी जावेदच्या प्री बर्थ डे पार्टीचा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
राखीने हा व्हिडिओ शेअर करून उर्फीला तिच्या वाढदिवसाच्या अगोदरच शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा :नेहा पेंडसेने नवऱ्याला सर्वांसमोर केले किस अन् VIDEO झाला व्हायरल या व्हिडीओमध्ये राखी नेहमीप्रमाणे तिच्या स्टाईलमध्ये शॉट्सवर शॉट्स मारताना मस्ती करताना दिसत आहे. राखीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात उर्फी केक कापताना दिसत आहे. आपल्या आउटफिट्समुळे चर्चेत असलेली उर्फी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. तर निळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये राखी खूप सुंदर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये राखी आणि उर्फी यांच्यात किती चांगलं बॉन्डिंग आहे, हेसुद्धा दिसतं. वाचा :‘शेवंता’ने Navratri निमित्त धारण केलेल्या आठ देवींचे माहात्म्य काय आहे ?, पाहा Photos उर्फी जावेद उत्तर प्रदेशातील लखनऊची आहे. तिने 2016 मध्ये ‘बडे भैया की दुल्हनिया’ या टीव्ही शोमधून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यासह तिने ‘चंद्र नंदनी’, ‘सात फेरे की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जिजी माँ’, ‘दयान’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, यामध्ये काम केलं आहे . त्यानंतर ती पुन्हा बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली. उर्फी जावेद तिच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे बऱ्याचदा ट्रोल होते, पण तरी देखील उर्फी नेहमी सोशल मीडियावर आपले बोल़्ड फोटो शेअर करत असते.