JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / अजय देवगणचा नवा ऐतिहासिक लुक व्हायरल, पुन्हा एकदा साकारणार मराठी भूमिका

अजय देवगणचा नवा ऐतिहासिक लुक व्हायरल, पुन्हा एकदा साकारणार मराठी भूमिका

नवीन वर्षाच्या सुरुवातीला अजय देवगणचं ऐतिहासिक चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ज्यामुळे त्याच्या या लुकची सोशल मीडियावर चर्चा जोरात सुरू आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जानेवारी : नवीन वर्षाच्या सुरुवातीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते आपल्या नव्या प्रोजेक्टबाबत घोषणा करतात. त्यात रणवीर सिंगने त्याच्या ‘गली बॉय’ सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. यानंतर लगेचच अजय देवगणचा एक ऐतिहासिक लुक समोर आला आहे. ज्यात तो फार छान दिसत आहे. या लुकची सोशल मीडियावर सध्या फार चर्चा होत आहे. अजय देवगणचा येणारा चित्रपट ‘तानाजी द अनसंग वॉरिअर’ सिनेमाचं पहिलंवहिलं पोस्टर 1 जानेवारीला रिलीज करण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतनं त्याच्या सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. सिनेमात अभिनेता अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अजयचे डोळे जास्त आकर्षित करत आहेत. अजय देवगणने आजपर्यंत अनेक मराठी भूमिका केल्या आहेत. परंतु या सिनेमातील ऐतिहासिक भूमिकेसाठी अजयने खास मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर काजोल लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात अजय देवगण आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. मुख्य बाब म्हणजे सिनेमात सुनील शेट्टीसुद्धा विशेष ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसत आहे. पंकज त्रिपाटी, साऊथचा खलनायक जगापती बाबू आणि मराठमोळा कलाकार अजिंक्य देवसुद्धा चित्रपटात असणार आहेत. तसंच सिनेमात आणखी बरेच नवीन चेहरे पाहायला मिळतील.

मराठी चित्रपटसृष्टीनंतर सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेले अजय-अतुल चित्रपटाचं संगीत करणार आहेत. सिनेमाचं पोस्टर जरी वर्षाच्या सुरुवातीला रिलीज करण्यात आलं असलं तरी चित्रपट दिवाळीनंतर रिलीज होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या