JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ट्विंकलचा राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियासोबतचा हा फोटो पाहिला नाहीत तर काय पाहिलं?

ट्विंकलचा राजेश खन्ना आणि डिंपल कपाडियासोबतचा हा फोटो पाहिला नाहीत तर काय पाहिलं?

ट्विंकल आणि उपहासात्मक बोलणं या जणू आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ती अनेकदा आपले आणि कुटुंबातील व्यक्तींचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, २८ एप्रिल- ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर फार सक्रीय असते. ती सद्य परिस्थितीवरचे आपले विचार आणि मतं कोणालाही न घाबरता सोशल मीडियावर शेअर करते. ट्विंकल आणि उपहासात्मक बोलणं या जणू आता एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ती अनेकदा आपले आणि कुटुंबातील व्यक्तींचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने आपल्या वडिलांसोबतच फार जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये राजेश खन्ना यांच्या हातात नुकतीच जन्मलेली ट्विंकल दिसते. फोटोत मुलीला हातात घेतल्यानंतरचा आनंद राजेश यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो तर डिंपलही या दोघांकडे पाहून हसतेय. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, ‘Treasures people find and send my way and yes even then it seems my weight was of paramount importance:) #OnceUponATime’ चक्क एवेंजर्सचा आर्यन मॅनने केली अक्षय कुमारची कॉपी, खिलाडीने शेअर केला फोटो

कर्करोगामुळे अशी झाली होती आयुष्मान खुरानाच्या बायकोची अवस्था हा फोटो एका वृत्तपत्रातला आहे. या फोटोला वर्तमानपत्रात कॅप्शन देण्यात आले होते की, ‘द खन्नाज.. राजेश, डिंपल आणि सात पाउडांची मुलगी. जसलोक हॉस्पिटलमधील फोटो.’ फनीबोन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्विंकलने आतापर्यंत मीसेस फनीबोन्स, लेजेण्ड ऑफ लक्ष्मी आणि पायजमाज आर फॉरगिवींग ही तीन पुस्तकं लिहिली आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विंकलने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने म्हटलं होतं की, ‘बाबा मी लेखिका व्हावं असं नेहमी म्हणायचे. माझ्या कविता वाचून त्यांना अभिमान वाटायचा. आता ओघाने माझ्या हातात पेपर आला.’ यूपीच्या या सेलिब्रिटींचीच चालते बॉलिवूडवर सत्ता

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या