मुंबई-, 20 फेब्रुवारी- ट्विंकल खन्नाला (Twinkle Khanna) आपण एक अभिनेत्री म्हणून ओळखतोच पण ती एक उत्तम लेखिका देखील आहे. सोशल मीडियावर (Social Media) ती तिचे विचार मांडत असते. कधी कधी ती तिच्या विचाराने लोकांना संभ्रमात टाकते तर कधी चेहऱ्यावर हासू आणते किंवा हासायला भार पाडते. तिनं नुकतीच एख सोशल मीडिया पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिच्या आजाराचा उल्लेख केला आहे. यामुळे तिला अनेकवेळा अडचणीचा सामना करवा लागला आहे. न विचार करता बोलल्यामुळे कसा अडचणीचा सामना करावा लागतो, असं जर तुमच्यासोबत झालं असेल तर ते शेअर करण्यासाठी देखील ट्विंकलने सांगितलं आहे. विचार न करता बोलल्यामुळे ट्विंकल खन्ना सापडली होती अडचणीत ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड सक्रिय असते. ट्विंकलने इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती इंचटेपच्या मदतीने काही तरी मापताना दिसत आहे. ती म्हणतेय की, बोलण्यापूर्वी विचार न केल्यामुळे कशाप्रकारे अडचणीचा सामना करावा लागतो. वाचा- PHOTOS : मलायका अरोराच्या बिकिनी लुकने सोशल मीडियाचा वाढवला पारा ट्विंकल म्हणते की, #FootInTheMouth ट्विंकलने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, दोनवेळा माफ घ्या आणि नंतरच कापा. मी असं करते जेव्हा मी काहीतरी लिहित असते. मात्र मी जेव्हा काही बोलणार असेल तेव्हा असं करायला पाहिजे असं ती म्हणताना दिसतेय. पुन्हा एकदा मी अडचणीत सापडले आहे…विचार न करता बोलण्याच्या आजारामुळे मी अनेकवेळा अडचणीत सापडले आहे, आणि ते खूपच लज्जास्पद आहे..#FootInTheMouth’
चाहते म्हणाले की, आम्ही जसे आहोत तसेच राहणार.. ट्विंकलच्या चाहत्यांनी मात्र तिच्या पोस्टचा उल्लेख करत म्हटलं आहे की, तुमच्या या बोलण्यापूर्वी विचार न करण्याच्या आजाराचा आम्हाला काहीच प्राब्लेम नाही किंवा त्रास होत नसल्याचे म्हटलं आहे. या आजाराचा दिखावा करण्यापेक्षा एका चाहत्याने म्हटलं आहे की, तुझी ही सवय अशीच सुरू ठेव…आम्ही सुधारणार नाही, जसं आहे तसं.. यासाठी काळजी करू नकोस…तर दुसऱ्याने म्हटले आहे की, तु एकदम योग्य बोलली आहेस… आता मी आजार आणि लक्षणे देखील सांगतो…असं म्हणत चाहत्यांनी तिला काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे.