अरबाज खान स्वतः या सर्व गोष्टीबद्दल दुःखी आहे. तो सांगतो, करण जोहर पासून ते करीना कपूर पर्यंत ज्या लोकांसोबत काम केलं आहे तो प्रत्येकजण सोशल मीडियावर युजर्सना मिळणाऱ्या स्वातंत्र्यामुळे त्रासलेला आहे.
मुंबई, 02 जुलै : बाॅलिवूड अभिनेत्री सनी लिओनवर वेब सीरिज बनतेय ‘करनजीत कौर: दि अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोनी’. त्याचा टीझर रिलीज झालाय. या 40 सेकंदाच्या टीझरमध्ये सनी लिओनच्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी पाहता येतात. सुरुवात तिच्या लहानपणीच्या फोटोनं होते. मग पेंटहाऊस मॅगझीनवरचा फोटो ते वर्तमानपत्रातल्या हेडलाईन्स असं बरंच काही यात आहे.
या वेबसीरिजचा प्रीमियर 16 जुलैला आहे. त्यात स्वत: सनी लिओन आहे. तिनं टीझर ट्विट केलाय. सनी लिओनवरची ही वेब सीरिज एकदम चर्चेत असण्याची शक्यता आहे. सध्या करण जोहरची लस्ट स्टोरीजची खूप चर्चा आहे. जी 5 या अॅपवर सनीची ही सीरिज पाहता येईल. हेही वाचा