JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : या टीव्ही अभिनेत्रीला करावा लागला लाजिरवाण्या क्षणाचा सामना, ऐनवेळी ड्रेसने दिला धोका

VIDEO : या टीव्ही अभिनेत्रीला करावा लागला लाजिरवाण्या क्षणाचा सामना, ऐनवेळी ड्रेसने दिला धोका

erica fernandes काही क्षणातच तिनं आपला ड्रेस ठीक केला. मात्र तोपर्यंत हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 जून : अभिनेत्रीसाठी त्यांचा अभिनय जितका महत्वाचा आहे तेवढीच त्यांचं स्टाइल स्टेटमेंट, ग्लॅमर आणि ड्रेसिंग त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. यासाठीच सर्व अभिनेत्री कोणत्याही इव्हेंटमध्ये आपल्या ड्रेसिंग आणि स्टाइलची विशेष काळजी घेताना दिसतात. मात्र नुकतंच एका अभिनेत्रीला ट्रेंडी ड्रेस घालणं चांगलच महागात पडलं. टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसला नुकत्याच एका इव्हेंटमध्ये ऐनवेळी तिच्या ड्रेसमुळे लाजिरवण्या क्षणाचा सामना करावा लागला. ‘अभिजीत बिचुकले मनोरुग्ण, त्याला चपलेने हाणला पाहिजे’

टीव्ही अभिनेत्री एरिका फर्नांडिसनं नुकतीच IWM buzz Style Awards 2019 ला हजेरी लावली होती. मात्र यावेळी तिच्या ड्रेसमुळे तिला लाजेनं मान खाली घालण्याची वेळ आली. ड्रेसचा काही भाग अचानक उघडल्यानं एरिका गोंधळ उडाला. काही क्षणातच तिनं आपला ड्रेस ठीक केला. मात्र तोपर्यंत हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला होता. सध्या एरिकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. अभिनेत्रीला अशा प्रकाराच्या क्षणाला समोरं जावं लागणं खरं तर अजिबात नवीन नाही. बॉलिवूड पासून ते हॉलिवूड पर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्री अशा प्रकारच्या लाजिरवाण्या क्षणांच्या शिकार ठरल्या आहेत. Kangana Ranaut ने आपल्या योग गुरूला गुरुदक्षिणा म्हणून दिला फ्लॅट

एरिका सध्या स्टार प्रवाह वरील प्रसिद्ध मालिका ‘कसौटी जिंदगी की 2’मध्ये काम करत असून या मालिकेत ती प्रेरणा ही मुख्य भूमिका साकारत आहे. एरिकाचा ड्रेस अशाप्रकारे अचानक उघडल्यानं या मालिकेतील तिच्या सहकलाकर पुजा बॅनर्जी आणि सुभावी चौकसे यांनी तिला तो ड्रेस ठीक करण्यासाठी मदत केली. या मालिकेत सुभावी एरिकाच्या सासूची तर पूजा तिच्या ननंदेची भूमिका साकारत आहे. क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेणार युवराज सिंग?

=============================================================== VIDEO: योग फिव्हर! डॉग स्क्वॉडने केलेल्या ह्या कवायती तुम्ही पाहिल्या का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या