JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दलजीत कौरला चुडा फ्लॉन्ट करणं पडलं महागात, लोकांनी दिला फुकटचा सल्ला

दलजीत कौरला चुडा फ्लॉन्ट करणं पडलं महागात, लोकांनी दिला फुकटचा सल्ला

दलजीत कौर आजकाल पती आणि मुलांसोबत खूप वेळ घालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर ही अभिनेत्री तिच्या आयुष्याशी संबंधित सर्व अपडेट्स शेअर करत असते.

जाहिरात

दलजीत कौरला चुडा फ्लॉन्ट करणं पडलं महागात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 एप्रिल- दलजीत कौरनं (Dalljiet Kaur) मागच्या महिन्यात लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर ती नवरा आणि मुलासोबत केनियाला शिफ्ट झाली आहे. दलजीत कौर आजकाल पती आणि मुलांसोबत खूप वेळ घालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर ही अभिनेत्री तिच्या आयुष्याशी संबंधित सर्व अपडेट्स शेअर करत असते. नुकतीच ही अभिनेत्री आपल्या कुटुंबासोबत जंगलात फिरताना दिसली आहे. पण फॅमिली टाईमचा हा व्हिडिओ तिला शेअर करणं चांगलचं महागात पडलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये नवी नवरी दलजीत कौर तिचा हातातला चुडा फ्लॉन्ट करताना दिसत आहे.तसेच या व्हिडिओमध्ये ती तिचा नवरा, त्याची मुलगी आणि तिचा मुलगा जेडनसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत तिनं म्हटलं आहे की, “वीकेंड असाच होता”.

संबंधित बातम्या

आता होतेय ट्रोल हा व्हिडिओ समोर येताच काही लोकांनी अभिनेत्रीला तिच्या वयाची आठवण करून देत ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका सोशल मीडिया युजरने लिहिलं आहे की, “हो बाई सगळ्यांना माहित आहे की तु चुडा घातला आहेस. 40 व्या वयाच 14 वर्षाच्या पोरीसारखं वागू नकोस. तर एका युजरने लिहिलं आहे की, फक्त आता मुलाला विसरू नको.

अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आहे. दलजीतने 18 मार्च रोजी एनआरआय (अनिवासी भारतीय) असलेल्या निखील पटेलशी दुसरं लग्न केलं. यापूर्वी दलजीतने अभिनेता आणि बिग बॉस 16 फेम शालीन भनोटशी लग्न केलं होतं, पण ते फार काळ टिकलं नाही. आपसातील मतभेदांमुळे दोघांनी 2013 मध्ये घटस्फोट घेतला. त्यांना एक मुलगा आहे. दीर्घ काळाच्या कायदेशीर लढाईनंतर दलजीत आणि शालीन वेगळे झाले. आता तिने नव्याने आयुष्य सुरू केलं आहे.

दलजीत कौरने एनआरआय निखील पटेलसोबत लग्न केलं. त्यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं होतं. तिने पैशांसाठी लग्न केलं असल्याचं म्हणत यूजर्स तिला ट्रोल केलं होतं. यामुळे यूजर्संना प्रत्युत्तर देत तसंच, विधवा आणि घटस्फोटित महिलांचं मनोबल वाढावं आणि त्यांनी सकारात्मक दृष्टीने आयुष्याकडे पाहावं, यासाठी दलजीत कौरने एक पत्र लिहिलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या