मुंबई, 17 फेब्रुवारी- छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ (tuzya mazya sansarala ani kay hava). या मालिकेच्या माध्यमातून एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्त्वं, कुटुंबीयांचं एकमेकांप्रती असलेलं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या सगळ्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. त्यामुळे ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिका आता एका वेगळ्या वळणावर आहे. अशातच मालिकेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. या मालिकेत मोठ्याबाई यांची भूमिका साकराणाऱ्या अभिनेत्री अंजली जोशी ( Anjali Joshi) यांनी मालिका सोडल्याची माहिती एका पोर्टलने दिली आहे. मालिकेत मोठी बाई ही भूमिका देखील खूप गाजतेय. ही भूमिका अभिनेत्री अंजली जोशी अगदी चोख बजावत असल्याचे दिसत होते. मात्र आता त्यांनी ही मालिका सोडल्याची माहिती समोर आली आहे. एका पोर्टलनं याबद्दल वृत्त दिलं आहे. त्यांच्याकडून याबद्दल कोणतीच अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही. मालिकेच्या निर्मांत्याकडून देखील कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या मालिका सोडण्यामुळे चाहत्यांची मात्र निराशा झालेली आहे. वाचा- ‘‘मला नाही येत. मला नाही जमत’’, सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत काहींनी मालिका सोडण्याचे कारण देखील विचारले आहे. तर काहींनी मालिकेलाच ट्रोल केलं आहे. तर एकानं म्हटलं आहे की, बरं झालं मालिका सोडली फालतू मालिका आहे. आणखी एका नेटकऱ्यांने म्हटलं आहे की, त्यांना कळलं असेल अशा बकवास सिरीयल मध्ये काम न केलेलं बर…अशा कमेंट करत सध्या नेटकरी मालिकेला ट्रोल करत आहेत.
मालिकेप्रमाणे अंजली जोशी घरात देखील आहेत मोठ्या जाऊबाई मालिकेप्रमाणे अंजली जोशी या लग्नानंतर एकत्र कुटुंबात आल्या आणि मालिकेप्रमाणेच त्या खऱ्या आयुष्यात देखील मोठी जाऊ आहेत. एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबद्दल सांगितलं होते. त्या पुढे म्हणाल्या होत्या की, माझ्या लग्नाच्या एका वर्षभरात 2 लहान जावा देखील कुटुंबात आल्या. त्यामुळे सासू सासरे, मी माझे पती आणि माझे 2 दीर आणि जावा असे आम्ही सगळे एकत्र राहत होतो. आम्ही सर्व जावा जवळपास एकाच वयाच्या त्यामुळे आमच्यातील बाँडिंग देखील खूप छान आहे. नंतर मुलं मोठी झाल्यामुळे जागेअभावी आम्ही वेगळे राहायला लागलो पण सण आणि वाढदिवसांना आम्ही एकत्र असतो आणि मिळून सर्व साजरे करतो त्यामुळे मला अजूनही मी एकत्र कुटुंब पद्धत असल्या सारखंच वाटतं.’